आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Underage Children Smoking Cigarette In Indonesia

धूम्रपानाच्या विळख्यात इंडोनेशियाची भावी पिढी, चार वर्षाची मूलेही ओढतात सिगारेट

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पश्चिमी देशात धूम्रपान करणा-यांची संख्‍या कमी होत असली तरी इंडोनशियामध्‍ये धूम्रपान करणा-यांची संख्‍या झपाट्याने वाढत आहे. या देशातील 60 टक्के पुरूष मोठ्या प्रमाणात धूम्रपान करतात. सर्वात वाईट बाब म्‍हणजे चार ते पाच वर्षे वयाची मूले मोठ्या प्रमाणता धूम्रपान करत आसल्‍याचे आढळून आले आहे.
सर्वाजनीक ठिकाणी स-हास मुले धूम्रपान करताना दिसतात. शाळेच्‍या मैदानावर असो किंवा घरी, प्रत्‍येक ठिकाणी धूम्रपान करणा-यांची संख्‍या पाहायला मिळते. यामुलांपैकी काही मुलांना दिवसभरामध्‍ये शिगारेटची दोन पॉकीट लागतात. यामुळे या देशाची भावी पिढी धूम्रपानाची शिकार होत आहे. सरकारला मात्र याबद्दल खंत नसल्‍याचे दिसून येते. तंबाखू सेवन करणे ही या देशातील लोकांची कमजोरी ठरली आहे. तंबाखू हे इंडोनेशियाच्‍या व्‍यवस्‍थेचा भाग झाला आहे, असे म्‍हटले तर धाडसाचे ठरणार नाही. प्रत्‍येक 10 पावलावर तंबाखूच्‍या आणि सिगारेटच्‍या जाहिराती पाहायला मिळतात. देशाचे आर्थिक नुकसान होणार नाही, यासाठी तंबाखू उत्‍पादनावर आळ घातला जात नाही. यामुळे धूम्रपान करणा-यांची संख्‍या वाढत असल्‍याचे तज्‍ज्ञ सांगतात.
पुढील स्‍लाईडवर पाहा मलेशियातील धूम्रपान करणा-या मूलांची फोटो...