साओ पावलो - ते दोघे भेटले, पहिल्याच भेटीत परस्परांना जिंकले... लगेच विवाहबंधनातही अडकले... संसाराची अशीच सात वर्षे उलटली. आता त्यांना एक सहा वर्षांची मुलगीही आहे. मात्र, अचानक एक दिवस त्यांना कळाले की दोघे चक्क सख्खे बहीण-भाऊ आहेत.
ब्राझीलमधील हे दाम्पत्य या धक्क्यातून सावरण्याचा प्रयत्न करत आहे. पत्नी अॅड्रियाना (३९) आणि पती लियान्ड्रो (३७) हे दोघे ब्राझीलमध्ये वेगवेगळया शहरांत वाढले. विशेष म्हणजे
दोघांच्याही जन्मदात्यांनी त्यांना लहाणपणीच सोडून दिले. दोघांचे पालनपोषण तिस-याच कुटुंबात झाले. मात्र, दोघांनाही
आपल्या आईचा शोध घ्यावयाचा होता.
दोघांची ओळख झाली तेव्हाही या दोघांनी आईच्या शोधार्थ आतापर्यंतचे आयुष्य घालवल्याचे परस्परांना सांगितले होते.विशेष म्हणजे दोघेही आईचे नाव मारिया असेच सांगत होते. दोघे विवाहबंधनात अडकल्यानंतर आता संयुक्तपणे त्यांनी दोघांच्याही आईचा शोध सुरू केला.