आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Unhappy Marriages Due To Low Blood Sugar News In Divya Marathi

भुकेल्या पोटी जोडीदारावर जळफळाट; ग्लुकोज कमी झाल्याने हिंसक मनोवृत्तीला चेव

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

वॉशिंग्टन - जोडीदारावर विनाकारण संताप येतो? संतापाचे रूपांतर हातघाईमध्ये होण्याच्या अगोदर झटपट पोटपूजा करून टाका. संताप चुटकीसरशी विरून जाईल, असा सल्ला संशोधकांनी दिला आहे.

वैवाहिक जीवनात अनेकदा पती-पत्नीचे भांड्याला भांडे लागते. परंतु पुष्कळदा काही कारण नसतानादेखील जोडीदाराचा राग येतो. त्यातून भांडणे होतात. त्यामागे भुकेले पोट असते, असे संशोधकांचे म्हणणे आहे. शास्त्रीय भाषेत रक्तातील साखरेचे प्रमाण कमी झाल्यानंतर व्यक्तीचे संतुलन ढळते आणि तो जोडीदारावर संतापू लागतो. त्यामुळे शरीरातील ग्लुकोजची पातळी कमी होणार नाही, याची काळजी घेणे महत्त्वाचे ठरते. साखरेचा समावेश असलेला पदार्थ खाताच रक्तातील साखरेची पातळी वाढू लागते. भूक लागल्यानंतर लोकांमध्ये अचानक चिडचिडेपणा वाढू लागतो, असे दिसून येते, असे ओहिओ विद्यापीठातील अभ्यासातून लक्षात आले आहे.

रागामुळे नुकसान
भूक लागल्यानंतर व्यक्तीला सामान्यपणे संताप निर्माण होतो. त्यातून पती-पत्नींमध्ये तू-तू, मैं-मैं होते. संघर्ष वाढून अनेकदा कौटुंबिक हिंसाचाराचे कृत्यदेखील घडून जाते. यातून व्यक्तीचे वर्तन बिघडू शकते. त्याचबरोबर नातेसंबंधातही नुकसान होण्याची शक्यता असते असे संशोधकांनी म्हटले आहे, असे प्रमुख संशोधक ब्रॅड बुशमन यांनी म्हटले आहे.