कराची - पाकिस्तानच्या कराची शहरातील जीना आंतरराष्ट्रीय विमानतळावर रविवारी मध्यरात्री तालिबानी अतिरेक्यांनी हल्ला चढवला. प्राथमिक माहितीनुसार 8 ते 10 अतिरेक्यांनी आधी ग्रेनेड फेकले. नंतर बेछूट गोळीबार करत त्यांनी धावपट्टीवर पोहोचण्याचा प्रयत्न केला. या वेळी चकमकीत चार सुरक्षारक्षक ठार झाले असून, दोन अतिरेकही मारले गेले आहेत.
सशस्त्र अतिरेक्यांनी ग्रेनेड हल्ला केल्यावर विमानतळ सुरक्षा दल (एएसएफ) आणि पाकिस्तानी रेंर्जसनीही प्रत्युत्तरादाखल हल्ला केला. रात्री उशिरापर्यंत गोळीबार सुरूच होता. विमानतळाच्या टर्मिनल 1 एला अतिरेक्यांनी लक्ष्य केले. या ठिकाणी हज यात्रेकरूंसाठी विर्शामाची व्यवस्था असते. घटनास्थळी एएसएफ आणि पाकिस्तानी हवाई दलाची पथके हजर आहेत. सुरक्षा दलांनी चहुबाजूंनी विमानतळ घेरले असून,सर्व रस्त्यांची नाकाबंदी करण्यात आली आहे.