आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सप्ततारांकित हॉटेलसारखी दिसतेय संयुक्त राष्ट्राची इमारत

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आंतरराष्ट्रीय संघटना अशी ओळख असलेल्या संयुक्त राष्ट्राची इमारत सप्ततारांकित हॉटेलसारखीच दिसते. १९५२ मध्ये इमारत तयार झाली. त्यानंतर तिचे पहिल्यांदा नूतनीकरण करण्यात आले. इमारतीचे बांधकाम अमेरिकेतील प्रसिद्ध आर्किटेक्ट मायकल अ‍ॅल्डरस्टॅन यांच्या मार्गदर्शनाखाली १९४६ मध्ये प्रारंभ झाले. १५५ मीटर उंच आणि ३९ मजले बांधण्यासाठी सहा वर्षे लागली. यास १२ हजार ६०० कोटी रुपये खर्च आला.
काही निवडक लोकांसोबत आर्किटेक्ट अ‍ॅल्डरस्टॅन यांनी या इमारतीची पाहणी केली. तेव्हा बरीचशी नवी माहिती समोर आली. महासभेच्या मुख्य सभागृहाच्या छताला कॉपर डोम असून त्याची दुरुस्ती करण्याऐवजी मूळ स्वरूप देण्यात आले आहे. डोमवर गेल्या ६० वर्षात साचलेली सिगार आणि सिगारेटच्या धुरामुळे खूपच गंज चढलेला होता. २००८ पर्यंत अनेक देशाचे सदस्य येथे धूम्रपान करत असत. त्यांना त्यापासून रोखण्यासाठी कडक नियम लागू करण्यात आले.

* महासभेच्या हॉलमध्ये सर्व प्रकारच्या कलाकृती, स्पीकर्स आणि इलेक्ट्रॉनिक उपकरणे लावण्यात आली आहेत. येथे सतत (इंग्रजी, फ्रेंच, स्पॅनिश, रशियन, अरबी, चिनी) अशा सहा भाषेतील अनुवाद ऐकण्याची सुविधा आहे.
* इमारतीत आधुनिक पद्धतीद्वारे सूर्यप्रकाशापासून बचाव करण्यासाठी विशेष उपाय योजण्यात आले आहेत. येथील विशिष्ट प्रकारच्या काचापासून उष्ण किंवा थंड हवामान बाहेरच थोपवले जाते. परंतु उजेड आत येतो. येथील दिवे एलईडीचे असून हवा खेळती राहण्यासाठीही उपाययोजना करण्यात आली आहे.
* मुख्य प्रवेशद्वार आणि कॉरिडॉर आकर्षक कलाकृती आणि डिझाइन्सनी सजवण्यात आले असून कॉरिडॉरमध्ये माणसाची वर्दळ असते.
* कोणत्याही दहशतवादी हल्ल्यापासून सुरक्षितता राखण्यासाठी खास व्यवस्था करण्यात आली आहे.
everythingnyc.co