संयुक्त राष्ट्रे - भारतीय महिला पोलिस इन्स्पेक्टरला संयुक्त राष्ट्रांच्या वतीने देण्यात येणारा ‘फिमेल पीसकिपर’ पुरस्कार नुकताच प्रदान करण्यात आला. जम्मू-काश्मीर पोलिस विभागातील इन्स्पेक्टर शक्तीदेवी यांना त्यांच्या अफगाणिस्तानातील विशेष कामगिरीसाठी गौरवण्यात आले.
संयुक्त राष्ट्र पोलिस पथकाच्या अफगाणिस्तान मोहिमेत शक्तीदेवी यांचा समावेश होता.
अफगाणिस्तानातील लैंगिक हिंसा व गुन्ह्यांच्या प्रकरणातील पीडितांच्या मदतीसाठी शक्तीदेवी यांनी विशेष योगदान दिले. आंतरराष्ट्रीय शांतता मोहिमेत पोलिसांच्या भूमिकेला प्रोत्साहन देण्यासाठी हे पुरस्कार दिले जातात. अफगाणिस्तानात विशेष महिला पोलिस दल निर्माण करण्यात, शक्तीदेवी यांनी महत्त्वाची भूमिका बजावल्याचे संयुक्त राष्ट्रांच्या पोलिस विभागाने नमूद केले आहे. महिला पोलिसांची अफगाण पोलिस दलातील कामगिरी सुधारण्यासाठी शक्तीदेवी यांनी परिश्रम घेतले.लैंगिक गुन्ह्यांचा तपास व फिर्यादींमध्ये पोलिस यंत्रणेविषयी विश्वास निर्माण करण्यासाठी त्यांनी शिस्तबद्ध प्रशिक्षण मोहिमेदरम्यान दिले. कॅनडा येथे होणा-या इंटरनॅशनल असोसिएशन ऑफ वुमन पोलिस (आयएडब्ल्यूपी)च्या संमेलनात शक्तीदेवी यांना
‘फिमेल पीसकिपर २०१४’ पुरस्कार प्रदान करण्यात आला.