आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

समाजात स्त्री-पुरुष समानतेचा संदेश रुजवण्यासाठी संयुक्त राष्ट्राची

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
संयुक्त राष्ट्र - समाजात स्त्री-पुरुष समानतेचा संदेश रुजवण्यासाठी संयुक्त राष्ट्राने जागतिक मोहीम राबवण्याचा संकल्प केला आहे. त्यासाठी आंतरराष्ट्रीय पातळीवर एक अभियान राबवण्यात येणार असून त्यात १ लाख पुरुष तसेच तरुणांना सहभागी करून घेण्यात आले आहे.

स्त्री-पुरुष समानतेसाठी संयुक्त राष्ट्राने ठेवलेले उद्दिष्ट अद्याप पूर्ण झालेले नाही. अनेक देशांत अजूनही असमानता पाहायला मिळते. त्यामुळे काही महिन्यांत उद्दिष्ट गाठण्यासाठी हे विशेष अभियान राबवण्याचा संकल्प करण्यात आला आहे. संघटनेचे सरचिटणीस बान की मून यांच्या हस्ते अभियानाच्या ऑनलाइन पोर्टलचे उद्घाटन शनिवारी करण्यात आले. अभियानात ब्रिटिश अभिनेत्री एम्मा वॅटसन हिची महत्त्वाची भूमिका राहणार आहे. एम्मा संयुक्त राष्ट्राची सदिच्छा राजदूत आहे.

संयुक्त राष्ट्राच्या महिला विभागाच्या वतीने हा कार्यक्रम राबवण्यात येणार आहे. २०१५ पर्यंत ही असमानता दूर करण्यासाठी जोरदार प्रयत्न केले जातील, अशी माहिती महिला विभागाचे प्रमुख फुमझील म्लाम्बो नागकुका यांनी एका मुलाखतीमध्ये दिली. ही मोहीम मार्चमध्येच जाहीर करण्यात आली होती. म्हणूनच पुरुषांची मानसिकता बदलली नाही तर पुढील ९५ वर्षेही त्यात बदल होणार नाही. २०२० मध्ये १ लाख ४० हजार मुलींचा वालविवाह होईल, असा इशाराही संयुक्त राष्ट्राकडून देण्यात आला.

‘ही फॉर शी’ चा उपक्रम
संयुक्त राष्ट्राच्या या उपक्रमाला ‘ही फॉर शी’ असे नाव देण्यात आले आहे. जगभरात महिलांना पुरुषांकडून असमानतेची वागणूक दिली जाते. ही असमानता दूर करण्यासाठी किमान १ लाख समर्थकांची फौज आहे. हे तरुण तसेच पुरुष त्यांच्या विचारांचे किमान १०० लोक तयार करतील.