आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नवी क्षितिजे: विद्यार्थ्यांना युनोचे राजकीय मुत्सद्देगिरीचे मिळणार धडे !

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

संयुक्त राष्ट्रे - जगातील एखाद्या संकटाच्या स्थितीतून मार्ग काढताना संयुक्त राष्ट्रात कशा पद्धतीने मुत्सद्देगिरी होते, याची माहिती विद्यार्थ्यांना दिली जाणार आहे. संयुक्त राष्ट्राने यासाठी प्रतिरूप संयुक्त राष्ट्र विकसित केले आहे.

मॉडेल यूनसंदर्भात जगभर विविध ठिकाणी परिषदा घेण्यात आल्या. यामध्ये संयुक्त राष्ट्रामध्ये ज्या पद्धतीने काम होते, त्याचे प्रतिबिंब परिषदेत उमटले नाही. एमयूएनच्या शिक्षणासाठी युनोची चालू पद्धती स्वीकारण्यात आली नाही. संयुक्त राष्ट्रात ठरावावर मतैक्य तयार करण्यासाठी वापरल्या जाणार्‍या पद्धतीचा अवलंब मॉडेल यूएनमध्ये करण्यात आला नाही, असे संयुक्त राष्ट्राच्या सार्वजनिक माहिती विभागाचे संचालक महेर नासीर यांनी दिली.

मॉडेल यूनच्या आयोजकांना विविध विषयांवरील मतभेदाची माहिती देण्यासाठी संयुक्त राष्ट्राने एमयूएनसाठी मार्गदर्शक तत्त्वे तयार केली आहेत. संयुक्त राष्ट्राच्या यासंदर्भातील पहिल्या कार्यशाळेत 36 देशांतील 80 प्रतिनिधींनी सहभाग नोंदवला होता. कोलंबियाची रहिवासी 15 वर्षीय गौलड्रोन स्थानिक सरकार व संयुक्त राष्ट्राच्या माहिती विभागासोबत प्रस्तावित शांतता वाटाघाटीसंदर्भात काम करत आहे.

पुढील वर्षी होणार्‍या सिम्युलेशन डेल मॉडेलो डी लास नॅकसिओन्स युनिडास परिषदेमध्ये (एसआयएमओएनयू) एमयूएन प्रतिनिधी म्हणून 1600 विद्यार्थी सहभागी होणार आहेत. हे विद्यार्थी सरकारी व खासगी शाळांतील आहेत. एमयून परिषद 1940 पासून जगभरात घेतली जाते.
विद्यार्थी राजदूताच्या भूमिकेत
मॉडले यूनमध्ये विद्यार्थी संयुक्त राष्ट्राच्या आमसभेत किंवा सुरक्षा परिषदेमध्ये राजदूताची भूमिका निभावतील. यामध्ये संयुक्त राष्ट्राच्या विषयपत्रिकेतील विविध मुद्दय़ांवर विद्यार्थी आपले मत मांडतील. एमयूएन आणि संयुक्त राष्ट्र एकमेकांपासून फार वेगळे नाहीत. एमयूएनमध्ये चर्चा कशा पद्धतीने पार पडते त्यावर विविध विषयांवरील मतभेद समोर येतील. संयुक्त राष्ट्राचे प्रतिरूप व संयुक्त राष्ट्रातील प्रत्यक्ष कामात बरेच अंतर आहे. आम्ही संसदीय कार्यपद्धतीचा अवलंब करतो, संयुक्त राष्ट्रात तसे होत नाही, असे कार्यशाळेत सहभागी औरा मारिया गौलड्रोनने सांगितले.

अझरबैजानमध्ये सुरक्षा परिषद
काही शाळांनी मॉडेल यूएनला शालेय अभ्यासक्रमात स्थान दिले आहे. अन्य काही शाळांनी नेतृत्वगुण विकसित होण्यासाठी परिषदांचे आयोजन केले आहे. अझरबैजानमध्ये 21-25 ऑक्टोबरदरम्यान मॉडेल यूएन सुरक्षा परिषदेचे आयोजन केले आहे.