वॉशिंग्टन - इस्लामिक स्टेट अतिरेक्यांच्या विरोधात
इराकला पाठबळ देण्यासाठी या आठवड्यात न्यूयॉर्कमध्ये सुरक्षा परिषदेची बैठक बोलावण्यात आली आहे. अमेिरकेचे परराष्ट्रमंत्री जॉन केरी यांच्या अध्यक्षतेखाली बैठक होईल, अशी माहिती परराष्ट्र मंत्रालयाच्या उपप्रवक्त्या मरे हार्फ यांनी दिली.
आयएसआयचा
इराक सरकारला भेडसावणारा धोका आणि मानवी हक्कविषयक स्थितीवर चर्चा करण्यासाठी सुरक्षा परिषदेतील सदस्य देशांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्यात आले आहे. शुक्रवारच्या बैठकीनंतर संयुक्त राष्ट्राची आमसभा होणार आहे. त्यामध्येही आयएसआयच्या वाढत्या धोक्यावर प्रकाश टाकण्यात येईल. याशिवाय
इराण, युक्रेन आणि मध्यपूर्व देशांतील अन्य विषयांवर चर्चा केली जाईल. मध्यपूर्वेतील संघर्षाच्या स्थितीआधी यूएनजीएसोबत युक्रेनमध्ये शांतता बहाल करण्यावर आम्ही लक्ष दिले. या कामात अडथळेही आले. शांततेच्या प्रयत्नांना युक्रेन आणि रशिया दोन्ही देशांनी पािठंबा दिला, असे हार्फ म्हणाल्या. संयुक्त राष्ट्राच्या आगामी बैठकीत कोणत्याही देशाने इतर देशाच्या सीमेवर अितक्रमण करू नये या मूळ धोरणावर भर दिला जाईल. रशियाने युक्रेनमध्ये याचे उल्लंघन केले होते. याव्यतिरिक्त आमसभेत अफगाणिस्तानचा मुद्दाही चर्चिला जाईल.