आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Unseen Photos Of First World War News In Marathi

बघा, 90 लाख लोकांचे प्राण घेणाऱ्या पहिल्या विश्वयुद्धाचे दुर्मिळ PICS

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पहिल्या विश्वयुद्धाला आता एक शतक पूर्ण झाले आहे. 1914 ते 1918 या दरम्यान युरोपमध्ये हे युद्ध झाले. यावेळी एका बाजूला अमेरिका, रशिया आणि फ्रान्स तर दुसऱ्या बाजूला जर्मनी, ऑस्ट्रिया, हंगरी आणि इटली यासारखे बलाढ्य देश होते. त्यानंतर ओटोमन एम्पायरपासून बुल्गारिया आणि जपानसह अनेक देश यात ओढल्या गेले.
इतिहासातील या महायुद्धात 6 कोटी युरोपियन नागरिकांसह 7 कोटी लष्करी जवानांनी भाग घेतला होता. यात 90 लाख लोकांनी आपले प्राण गमावले होते. सांगितले जाते, की 28 जून 1914 रोजी ऑस्ट्रियाच्या सिंहासनाचे उत्तराधिकारी आर्चड्युक फ्रांज फर्डिनेंड आणि त्यांच्या पत्नीच्या हत्येतून या युद्धाची सुरवात झाली होती. त्यानंतर ठिक एका महिन्याने ऑस्ट्रियाने सर्बियाविरुद्ध युद्ध छेडले.
रशिया, फ्रांस आणि ब्रिटनने सर्बियाची मदत केली. जर्मनीने ऑस्ट्रियाच्या बाजूने युद्ध लढले. यानंतर एक एक करुन जवळपास सर्वच जागतिक सत्ता यात ओढल्या गेल्या. सुरवातीला जर्मनीचा विजय झाला. परंतु, 1917 मध्ये जर्मनीने अनेक व्यापारी जहाजे बुडवली. त्यामुळे नाराज झालेल्या अमेरिकेने ब्रिटनच्या बाजूने युद्ध लढले.
या भयावह युद्धाचे, जिवाचा थपकाप उडवणारे फोटो... बघा पुढील स्लाईडवर