(फोटो- पेशावरमधील आर्मी पब्लिक स्कूलची एक खोली.)
पेशावरमधील आर्मी पब्लिक स्कूलवर दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात या चकाचक आणि प्रतिष्ठित शाळेचे चक्क खंडर झाले आहे. येथील खोल्या ओळखणेही अवघड होऊन बसले असून सामानाची प्रचंड नासधूस झाली आहे. एका आत्मघातकी दहशतवाद्याने या शाळेच स्वतःला उडवून दिले होते. ही खोली तर एखाद्या डेथ चेंबरसारखी भासते. या शाळेची अवस्था आता भुतगाहसारखी झाली आहे.
दरम्यान, दहशतवादी हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी जगभरात प्रार्थना घेऊन या घटनेचा निषेध करण्यात आला. पाकिस्तानचे राजकीय आणि लष्करी नेतृत्व पेशावरमध्ये गोळा झाले. दहशतवाद्यांच्या धमक्यांना, भीतीला भीक न घालता निषेध मार्च आयोजित करण्यात आले. त्यात निर्भिडपणे चिमुकले सहभागी झाले.
पुढील स्लाईडवर बघा, दहशतवादी हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी टिपण्यात आलेले फोटो... घडलेल्या घडामोडी...