आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Unwanted Mobile Bill Come To John Brain In Australia, Divya Marathi

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

चोरलेल्या फोनद्वारे एका दिवसात ३.१५ कोटींचे कॉल

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एखादा माणूस रजेवर असेल आणि त्याला जर कळले, त्याच्या फोनचे बिल ३ कोटींहून जास्त आलेले आहे, तर त्याची अवस्था कशी होईल? त्याने तेवढे कॉल केलेलेच नाहीत, मग इतके मोठे बिल कसे आले? कारण फोन चोरीस गेलेला होता. ऑस्ट्रेलियातील जॉन ब्रेनले (नाव बदलले आहे) याच्यासंदर्भात अशी घटना घडली आहे. ते कुटुंबासमवेत युरोप प्रवासात होते.
त्यांच्या मुलाचा फोन चोरीस गेला होता. त्यांनी फोनची सुविधा देणा-या ओम्बड्समन या ऑस्ट्रेलियन कंपनीस तशी सूचना दिली. परंतु जेव्हा ते ऑस्ट्रेलियात परतले तेव्हा बिल पाहून त्यांना आश्चर्याचा धक्काच बसला. कंपनीने त्यांना ३ कोटी १५ लाख ३७ हजारांचे बिल पाठवले होते. तपासाअंती असे समजले की, चोरीस गेलेल्या फोनचा वापर डेव्हिड नावाच्या एका माणसाने केला होता. त्याने एका दिवसात अनेक वेळा सोमालियास कॉल केले होते.
ओम्बड्समन कंपनीने त्याला सांगितले, त्यांचा फोन चोरीस गेला त्याच्या दुस-या दिवशी त्यांनी तक्रार केली होती. शेवटी कंपनीने त्यांचे बिल माफ केले.

डाटा रोमिंगचे रोमिंग दर सर्वाधिक
या घटनेकडे जगाचे लक्ष गेले. कारण मोबाइल सेवा देणा-या कंपन्यांनी डाटा रोमिंगचे दर सर्वाधिक असतात. ती जास्तीची रक्कम वसूल करण्यासाठी असा मार्ग अवलंबला होता. अशा लोकांना ई-मेल चेक करत असतानाच मोठी रक्कम द्यावी लागते. काही वेळेपूर्वी एका अहवालात ही गोष्ट स्पष्ट झाली. ओईसीडीच्या अहवालात नमूद केले आहे की, ऑस्ट्रेलिया ७ व्या क्रमांकावर आहे. पहिल्या क्रमांकावर पोलंड, जपान, इस्रायल, चिली, मेक्सिको, अमेरिका आणि कॅनडा आदी देश आहेत. इजिप्त आणि आइसलँडमध्ये दर कमी आहेत.
cnn.com