आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भारतीय व्यवस्थापक महिलेस 3 लाख डाॅलर्सचा दंड

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
न्यूयॉर्क - भारतीय व्यवस्थापक महिलेला अमेरिकन कोर्टाने ३ लाख अमेरिकन डॉलर्सचा दंड ठोठावला आहे. रिमा शहा यांनी अवैधरीत्या याहू कंपनीची वित्तीय माहिती लीक केल्याचा आरोप अमेरिकन सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज कमिशनने केला होता.
वर्ष २०१२ मध्ये देशांतर्गत व्यापारी गोपनीय माहिती लीक करण्याबद्दल ४२ वर्षीय रिमा यांच्यावर गुन्हा सिद्ध झाला होता. फेडरल सिक्युरिटी लॉचे उल्लंघन केल्याबद्दल १ हजार २९६ डॉलर्सचा अतिरिक्त दंडही त्यांना सुनावण् यात आला आहे. शहा या मालमत्ता व्यवस्थापन फर्ममध्ये पोर्टफोलिओ व्यवस्थापक म्हणून कार्यरत होत्या. ही कंपनी म्युच्युअल व हेज फंड व्यवस्थापनाचे कार्य करते. शहा यांच्यावर येथील सत्र न्यायालयाने गुन्हेगारी खटला चालवला.

चाैकशीदरम्यान शहा यांनी संपूर्ण सहकार्य केल्याची टिप्पणी कोर्टाने केली आहे.