आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मेडिसन स्क्वेअरवर भारतीय पंतप्रधानांविरोधात आंदोलन, मोदींना म्हटले हत्यारा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
न्यूयॉर्क - येथील मेडिसन स्क्वेअर गार्डनवर रविवारी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे भव्य स्वागत झाले, तर शीख आणि मुस्लिम समुदायाच्या लोकांनी त्यांच्या विरोधात धरणे आंदोलन केले. आंदोलकांची मागणी होती, की अमेरिका सरकारने मोदींच्या संबंधीत त्यांच्या धोरणांचा पूनर्विचार करावा. आंदोलक मोदींविरोधी बॅनर आणि पोस्टर घेऊन रस्त्यावर उतरले होते. त्यावर नरंद्र मोदींना हत्यारा आणि फॅसिस्ट संबोधले होते.
मोदींना कायम विरोध करत राहाणार
आंदोलकांचे म्हणणे आहे, की 2002 मध्ये गुजरातमध्ये झालेल्या दंगलीनंतर दंगलपीडितांना अजून न्याय मिळालेला नाही. न्यूयॉर्कचे 47 वर्षीय गुरपतवंत पन्नन म्हणाले, 'आम्ही मोदींना कायम विरोध करत राहाणार. भारतात धार्मिक अल्पसंख्याकांची स्थिती अजून सुधारलेली नाही, उलट ती दिवसेंदिवस खराब होत गेली आहे. सध्या भारतात अल्पसंख्याकांचे अस्तित्व धोक्यात आहे.'
अमेरिका सरकारच्या भूमिकेने दुःखी
2002 च्या गुजरात दंगलीनंतर अमेरिका सरकारने मोदींवर व्हिजा बंदी घातली होती. डेलव्हर येथील निशरीन जाफरी म्हणाल्या, 'अमेरिका सरकारने मोदींचा व्हिजा रद्द केल्यामुळे आम्हाला दिलासा मिळाला होता. मात्र, सरकारच्या सध्याच्या भूमिकेमुळे आम्ही नाराज आहोत. पण शांत राहाणार नाही. मी राजकारणात नाही. मात्र गेल्या दशकभराच्या काळातील अमेरिकेच्या परराष्ट्र धोरणाची मला चांगली माहिती आहे.'
त्या म्हणाल्या, 'मला कळत नाही, अमेरिकेला हे माहित नाही का, की 2002 मध्ये गुजरातमध्ये काय झाले होते.' निशरीन या भारतातील माजी खासदार एहसान जाफरी यांच्या कन्या आहेत. 2002 च्या गुजरात दंगलीमध्ये अहमदाबादमधील गुलबर्ग सोसायटीमध्ये ज्या 69 लोकांची हत्या करण्यात आली होती त्यात एहसान जाफरीही होते.
नरेंद्र मोदी गुजरातचे मुख्यमंत्री असताना 2002 मध्ये झालेल्या धार्मिक दंगलींवर नियंत्रण आणण्यात ते अपयशी राहिल्याचा त्यांच्यावर आरोप ठेवून अमेरिकने 2005 मध्ये त्यांना व्हिजा देण्यास नकार दिला होता. आता मोदी भारताचे पंतप्रधान म्हणून अमेरिकेला गेले आहेत.

पुढील स्लाइडमध्ये पाहा, आंदोलनाची छायाचित्रे