आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करावॉशिंग्टन - इराणकडे अणुबॉम्ब नाही. बॉम्ब बनवण्याचा इरादाही नाही, असा अहवाल अमेरिकेच्या 16 गुप्तचर संस्थांनी दिला आहे. चार वर्षांपासून जंग जंग पछाडूनही गुप्तचर संस्थांना इराणच्या अण्वस्त्र निर्मितीचा कोणताही ठोस पुरावा हाती लागलेला नाही असे निष्पन्न झाले आहे.
इराणच्या अण्वस्त्र कार्यक्रमाचा नुकताच अमेरिकी गुप्तचर संस्थांनी आढावा घेतला. त्यात ही बाब उघड झाली आहे. इराणने अण्वस्त्र निर्मितीचा इरादा सोडून दिला आहे, असा अहवाल प्रथम सन 2007 मध्ये देण्यात आला होता. तेव्हापासून आजतागयत गुप्तचर संस्थांच्या अहवालात वारंवार हेच स्पष्ट झाले आहे. काही दिवसांपूर्वी अमेरिकेने पुन्हा इराणमधील परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर त्यावर शिक्कामोर्तब झाले. अमेरिकेतील आघाडीचे दैनिक ‘न्यूयॉर्क टाइम्स’ने हे वृत्त दिले आहे.
संशयकल्लोळ - इराणच्या अण्वस्त्र निर्मितीबद्दल आणखी एक तर्क गुप्तचर आणि विश्लेषकांनी मांडला आहे. तो म्हणजे प्रत्यक्ष अणुबॉम्ब तयार करण्याऐवजी अण्वस्त्र निर्मितीबद्दल नुसताच संशयकल्लोळ करून आपली ताकद वाढवण्याचे त्यांचे डावपेच आहेत. त्यामुळे इतर राष्ट्रांना आपोपाच धाक बसतो.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.