फोटो: ISIS प्रमुख अबू बकर अल बगदादी
लंडन -
इराक आणि सिरियाच्या सीमेवर एका वस्तीत बैठकीसाठी एकत्र आलेल्या दहशतवादी संघटना ISISच्या बड्या नेत्यांवर अमेरिकेने केलेल्या हवाई हल्ल्यात संघटनेचा प्रमुख अबू बकर अल बगदादी गंभीर जखमी झाल्याचे सांगितल्या जात आहे. इंग्रजी वेबसाईट डेलीमेलने स्थानिक सरकारी सुत्र आणि दोन प्रत्यक्षदर्शींकडून मिळालेल्या माहितीनुसार सांगितले आहे की, ज्या घरात ISISचे नेते एकत्र आले होते, तेथे या गटाचे सर्वात वरीष्ठ कमांडर अबू अल बगदादीसुध्दा उपस्थित होते. अमेरिकेच्या हवावी हल्ल्यात अनेक लोक ठार झाले आहेत. हल्ल्यानंतर स्थानिक ISISच्या दहशतवाद्यांनी रस्त्यांवर लाऊडस्पीकरच्या साह्याने जखमींसाठी रक्तदान करण्याचे आवाहन केले आहे. स्थानिक सुत्रांनी असे ही सांगितले की, या हल्ल्यात हाय प्रोफाईल ISIS नेत्यांनावरील उपचारासाठी संपूर्ण रुग्णालयाला खाली करण्यात आले आहे.
हा हल्ला अलकाइम नावाच्या एका वस्तीवर करण्यात आला. बगदादीला निशाना बनवल्यानंतर
इराकी अधिकार्यांनी या प्रकरणात कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. तर अमेरिकेनेसुध्दा या बातम्यांना मान्य केले नाही आणि त्यांचा विरोधही केला नाही. ISISच्या ट्वीटर अकाऊंटवर या हल्ल्यात बगदादीवर हल्ला केल्याच्या बातमीचा विरोध केला आहे.
पाश्चिमात्य देशांना मिटवण्यासाठी आणि संपूर्ण जगात मुस्लिम देश बनवण्याचे स्वप्न पाहाणार्या बगदादीवर हल्ला करणे हे अमेरिकेसाठी खुप महत्त्वाची घटना मानले जात आहे. अमेरिकेच्या हवाई हल्ल्यात ठार झालेल्या ISIS दहशतवाद्यांमध्ये काही स्थानिक नेतेसुध्दा होते. स्वयंघोषित मुस्लीम नेता असलेला बगदादी अमेरिकेत बंदी होता. ISISचा वाढता प्रभाव आणि दहशतवाद पाहाता इंग्लंड आणि कॅनडासुध्दा त्यांचे वर्चस्व असलेल्या ठिकाणांवर हवाई हल्ले करत आहेत.
पुढील स्लाईडवर पाहा, सीरियाच्या सीमेवर असलेल्या कोबानमध्ये ISIS चे दहशतवादी आणि कुर्दिश लडाक्यांमधील युध्दाचे फोटो...