आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • US Airways Apologizes For Tweets Vulgar Image To Customer

यूएस एअरवेजने महिला प्रवाशाला पाठविली \'अश्लील ग्राफिक्स इमेज\'; कंपनीने मागितली माफी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वाशिंग्टन- 'यूएस एअरवेज'ने एका महिला प्रवाशाला अधिकृत 'ट्विटर अकाउंट'वरून 'अश्लील ग्राफिक्स इमेज' पाठविल्याने खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे 'ट्‍विटर'वर कथित अश्लील इमेज व्हायरल झाली आहे. दरम्यान, याप्रकरणी सोमवारी (14 एप्रिल) यूएस एअरवेज कंपनीवर माफी मागण्याची नामुष्की ओढवली.

बहुतेक एअरवेज कंपन्यांनी सोशल मीडियावर आपले अधिकृत अकाउंट तयार केले आहे. या माध्यमातून प्रवाशांना प्रवासादरम्यान निर्माण होणारे प्रश्न सोडविले जातात. विशेष म्हणजे प्रवासादरम्यान गहाळ झालेल्या सांहित्यानाबाबतही पूर्ण सहकार्य केले जाते. मात्र, यूएस एअरवेजने आपल्या अधिकृत 'ट्‍विटर' अकाउंटवरून एका महिला प्रवाशाला चक्क अश्लील ग्राफिक्स इमेज पाठविली. त्यामुळे चांगलीच खळबळ उडाली.
एला नामक प्रवाशी ज्या फ्लाइटने प्रवास करत होती, ती फ्लाइट एक तासांहून जास्त वेळ एका एअरपोर्टवर थांबले होते. त्यावर एलाने यूएस एअरवेजच्या अधिकृत 'ट्विटर' अकाउंटवर रितसर तक्रार दिली. या असुविधेबद्दल त‍िला एअरलाइस कंपनीतर्फे तत्काळ रिप्लाय देऊन क्षमाही मागितली. यानंतर एलाने आणखी एक तक्रार नोंदविली. मात्र कंपनीतर्फे तक्रारीला दिलेल्या रिप्लायमध्ये एक अश्लील ग्राफिक्स इमेज जोडली होती. यूएस एअरवेजतर्फे महिला प्रवाशाला पाठविलेला 'अश्लील इमेज'चा 'ट्वीट' सध्या खूप व्हायरल झाला आहे.

पुढील स्लाइ्ड्‍सवर वाचा, यूएस एअरवेजने मागितली माफी...