अमेरिकेच्या नजरेत अण्णा / अमेरिकेच्या नजरेत अण्णा आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ एकसारखेच

वृत्तसंस्था

Dec 28,2011 03:54:12 PM IST

वॉशिंग्टन- अमेरिकेची गुप्तचर संघटना सीआयएची नजर या दिवसात अण्णा हजारे व त्यांची संघटना 'इंडिया अगेंस्ट करप्शन'कडे आहे. तसेच अण्णा भारतात राजकीय दबाव गट म्हणून काम करीत असल्याचे म्हटले आहे.
अण्णा व त्यांची संघटना ही राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (आरएसएस), बजरंग दल, विश्व हिंदू परिषद, हुर्रियत कॉन्फरस या श्रेणीत मोडत असल्याचे सीआयएने म्हटले आहे. त्यामुळे सीआयएच्या 'वर्ल्ड फॅक्टबुक'मध्ये 'पॉलिटिकल प्रेशर ग्रुप एंड लीडर्स' या कॅटेगिरीत अण्णा हजारे यांना सामील केले गेले आहे.
सीआयएच्या या यादीमध्ये काश्मीर खोरयातील ऑल इंडिया हुर्रियत कॉन्फरस (वेगळ्या काश्मीरची मागणी करणारी संघटना), बजरंग दल (धार्मिक संघटना ), इंडिया अगेंस्‍ट करप्‍शन (अण्णा हजारे), जमीयत उलेमा-ए-हिंद (धार्मिक संघटना), आरएसएस (मोहन भागवत), (धार्मिकसंघटना) आणि विश्व हिंदू परिषद (अशोक सिंघल), (धार्मिक संघटना) इत्यादी समूह किंवा त्यांचे लोक, नेते राजकीय पातळीवर सरकारवर दबाव टाकत असल्याचे म्हटले आहे. त्यात वरील संघटनांटा सीआयएच्या 'वर्ल्ड फॅक्टबुक'मध्ये 'पॉलिटिकल प्रेशर ग्रुप एंड लीडर्स' या संघटनाचा समावेश केला आहे.
सीआयएच्या वेबसाइटवर ही यादी टाकण्यात आली असून ती शेवटी २० डिसेंबरला अपडेट केली आहे. मजबूत लोकपाल विधेयक मंजूर करण्यासाठी अण्णा हजारे २७ डिसेंबरपासून पुन्हा एकदा मुंबईत उपोषणाला बसले आहेत.

X
COMMENT