आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • US Congress Approves 225 Million Dollar Package For Israel Missiles

गाझा हिंसाचार: मिसाईल इस्रायलचे, पैसा अमेरिकेचा, अमेरिका देणार 1300 कोटी रुपये

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
File Photo - इस्रायलचे आयर्न डोम मिसाइल सिस्टम

गाझा/वॉशिंग्टन - इस्रायल पॅलेस्टाईन संघर्षाप्रकरणी अमेरिकेची दुटप्पी भूमिका असल्याचे दिसत आहे. एकिककडे अमेरिका संयुक्त राष्ट्राच्या मदतीने या प्रकरणी तोडगा काढण्याच्या प्रयत्नात आहे. त्याचवेळी शुक्रवारी अमेरिकन काँग्रेसने इस्रायल डिफेंस फोर्सच्या मिसाइल स्टॉकसाठी 225 मिलियन डॉलरच्या (सुमारे 1300 कोटी) पॅकेजला मंजुरी दिली.
अमेरिकन काँग्रेसने मंजुर केलेल्या या पॅकेजद्वारे आयर्न डोम सिस्टममध्ये वापरल्या जाणा-या श्रेपणास्त्रांची खरेदी केली जाणार आहे. गाझापट्टीहून केल्या जाणा-या हल्ल्यासाठी त्यांचा वापर केला जात आहे. विशेष म्हणझे गेल्या चार आठवड्यांत इस्रायलने या मिसाइलच्या मदतीने हमासचे शेकडो रॉकेट नष्ट केले आहेत. काँग्रेसच्या मंजुरीनंतर हे बिल राष्ट्रपती बराक ओबामांकडे जाईल. ओबामाही त्याला लगेचच पास करतील अशी शक्यता आहे.

इस्रायलच्या स्वसंरक्षणाच्या धोरणाला पाठिंबा
शुक्रवारी व्हाइट हाऊसमध्ये झालेल्या एका पत्रकार परिषदेत अमेरिकेचे राष्ट्रपती बराक ओबामा यांनी इस्रायलच्या स्वसंरक्षणाच्या धोरणाचे समर्थन केले. त्याचवेळी पॅलेस्टाईनमध्ये मारल्या जाणा-या निर्दोषांच्या मृत्यूचा निषेधही त्यांनी केला.
दरम्यान, इस्रायल डिफेन्स फोर्सचा 23 वर्षीय सेकंड लेफ्टनंट हदर गोल्डिन याला हमास दहशतवादी अपहरण करून घेऊन गेले आहेत. 2006 मध्येही हमासने इस्रायलच्या एका सैनिकाचे अपहरण केले होते. 1,000 पॅलेस्टीनी कैद्यांच्या मोबदल्यात पाच वर्षांनी त्याची सुटका करण्यात आली.

इस्रायलने मात्र आपल्या सैनिकाच्या मृत्यूची शक्यता व्यक्त केली आहे. हमासने मात्र अपहरणाचे वृत्त फेटाळले आहे. अपहृत सैनिकाला शोधण्यासाठी इस्रायली सेनेची शोधमोहीम सुरू आहे.

पुढील स्लाइडवर पाहा गाझा आणि इस्रायलचे काही फोटो...