आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • US Court Convicts Bin Laden Son In Law, America, New York

ओसामा बिन लादेनच्या जावायाला जन्मठेप; अमे‍रिकेतील कोर्टाने सुनावला निकाल

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

न्यूयार्क- अमेरीकेतील एका कोर्टाने दहशतवादी ओसामा बिन लादेन याचा जावई सुलेमान अबु घेथ याला जन्मठेपेची शिक्षा ठोठावली आहे. 48 वर्षीय अबुवर हत्या करणे, दहशत पसरवणे, दहशतवाद्यांना शस्त्रास्त्र उपलब्ध करून देणे आणि दहशतवादी कटात सहभागी होण्याचे आरोप आहेत. अबु हा कुवेत येथील रहिवाशी आहे.

अबु हा अमेरिकेत लादेनचा 'माउथपीस' म्हणून काम करत होताे. लादेनचा खात्मा झाल्यानंतर अबुला अमेरिकेतील पोलिसांनी अटक केली होती. 'अलकायदा'चे तरुणांना प्रशिक्षण देणे तसेच चिथावणीखोर भाषणाच्या व्हिडिओ क्लिप तरूणांना दाखवून त्यांना 'अलकायदा'मध्ये सहभागी करून घेण्यात अबुचा हातखंड आहे.

2001 मध्ये ब्रिटान रिचार्ड रेडद्वारा एका जहाजमध्ये 'शू बॉम्ब' ठेवल्याचे अबुला माहीत होते. विशेष म्हणजे अमेरिकेत झालेल्या 9/11 च्या दहशतवादी हल्लाबाबत अबुला माहित होते. त्यात त्याचाही हात होता.

अबुच्या वकीलांनी मात्र कोर्टाने दिलेल्या निकालावर नाराजी व्यक्त केली आहे. अबुवर ठेवण्यात आलेले सर्व आरोप खोटे असल्याचे वकिलांनी म्हटले आहे. अबुने कधीही दहशतवाद्यांना मदत केली नाही. तसेच तो अलकायदाचा सदस्यही नसल्याचे कोर्टात सांगितले. 9/11च्या दहशतवादी हल्ल्याची माहिती त्याला वृत्तपत्रातून समजली होती. असे त्याच्या वकीलांनी सांगितले.