आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सोनिया गांधींना अमेरिकन तर युवराज राहुल यांना चंदीगड कोर्टाने बजावले समन्स

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

न्यूयॉर्क - अमेरिकेतील एका कोर्टाने कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्याविरूद्ध समन्स बजावले आहे. न्यूयॉर्कमधील जिल्हा कोर्टात एका शिख मानवतावादी संघटनेने नोव्हेंबर 1984 मध्ये शिखांविरोधात झालेल्या हल्ल्यासंदर्भात फिर्याद दाखल केली आहे. या फिर्यादीवरून सोनिया गांधींविरूद्ध समन्स बजावण्यात आले आहे.

मानवतावादी संघटनेने नोव्हेंबर 1984 मध्ये झालेल्या शिखविरोधी दंगलींबाबत नुकसान भरपाई मिळण्याबाबत तसेच कारवाई करण्याची मागाणी केली आहे.

27 पानी फिर्यादीमध्ये म्हटले आहे, की 1984 मध्ये नोव्हेंबर महिन्याच्या 1 ते चार तारखेला 30 हजार लोकसंख्या असलेल्या शिख समुदायास भारतात सत्तेत असलेल्या कॉंग्रेस नेत्यांनी जाणीवपूर्वक टार्गेट केले होते. तसेच शिखविरोधी दंगलींमध्ये सहभागी असलेल्या कमल नाथ, सज्जन कुमार, जगदीश टायटलर व अन्य कॉंग्रेस नेत्यांना सोनिया गांधींकडून संरक्षण मिळत असल्याचाही आरोप करण्यात आला आहे. अमेरिकन कायद्यानुसार या समन्सचे 120 दिवसांचा कालावधीत उत्तर अपेक्षीत असल्याचे समजते.

पुढील स्लाईड्‍सवर वाचा, कॉंग्रेसचे युवराज राहुल गांधी यांना कोर्टाचे समन्स