वॉशिंग्टन - ओसामा बिन लादेनला मारण्यासाठी आखण्यात आलेल्या गुप्त ऑपरेशन करिता अमेरिकेने पाकिस्तानची मदत घेतली नव्हती, असे खूलासा अमेरिकेच्या माजी परराष्ट्र मंत्री हिलरी क्लिंटन यांनी आपल्या 'हार्ड चॉईस' या पुस्तकात केला आहे. या करिता त्यांनी आयएसआयला जबाबदार धरले आहे.अॅबोटाबादमध्ये गुप्तहेर संस्था आयएसआयचा अल कायदा आणि तालिबानबरोबर खूप जवळचे संबंध राहिले आहेत, असे हिलरी यांनी आपल्या पुस्तकात सांगितले आहे. त्यांच्या पुस्तकाविषयी जगभर उत्सुकता ताणली होती.
मंगळवारी(ता. 10) प्रकाशित झालेल्या पुस्तकात लादेनविरूध्द करण्यात येणा-या ऑपरेशनबाबत राष्ट्राध्यक्ष बराक ओबामांसह संरक्षण मंत्री रॉबर्ट गेट्सबरोबर सविस्तर चर्चा करण्यात आली. त्यात पाकिस्तान भारतावर हल्ला करू शकतो अशी शंका उपस्थित करण्यात आली. पंरतु शेवटी पाकिस्तानला या गुप्त कारवाईविषयी माहिती न देण्याचा निर्णय घेण्यात आला.
लादेन जिथे आश्रय घेऊन राहत होता तिथे हल्ला करावे, कि नाही यावरून वादावादी झाली. या निर्णयामुळे पाकिस्तान आणि अमेरिका यातील संबंधांवर परिणाम होऊ शकतो, असा अंदाज बांधण्यात आला होता.पाकिस्तानची मदत चालू राहिल असे हे सर्व शक्यता ध्यानात घेऊन गेट्स यांनी सांगितले. अफगाणिस्तानमध्ये त्या देशाने खूप मोठी मदत केली, असे त्यांनी लक्षात आणून दिले.
आयएसआयवर अमेरिकन सरकारचा अविश्वास
65 वर्षांच्या क्लिंटनने पुस्तकात म्हटले, पाकिस्तानबरोबरील संबंधांबाबत आम्ही एकमेंकांना वेळ दिला आहे. गुप्त ऑपरेशनमध्ये ओसामा बिन लादेनला मारले. जगातील सर्वात कुप्रसिध्द दहशतवादी आणि अल-कायदा प्रमुख ओसामा बिन लादेनला 2 मे, 2011 मध्ये राष्ट्राध्यक्ष बराक ओबामांच्या विशेष आदेशांतर्गत मारण्यात आले. पाकिस्तानची राजधानी इस्लामाबादच्या उत्तरेत असलेल्या अॅबोटाबादमध्ये अमेरिकेने केलेल्या कारवाईत लादेनसह तीन इतर जण मारण्यात आले. यात लादेनच्या मुलाचाही समावेश होता. अमेरिकन अधिका-यांच्या माहितीनुसार, लादेनचा मृतदेह समुद्रामध्ये पुरण्यात आला.
पुढे वाचा... भारताने म्हटले होते - पाकिस्तानला धडा शिकवू