आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • US Expert Said AlQaeda Conspiring Against Narendra Modi

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

नरेंद्र मोदींना इस्लामचा शत्रू ठरवण्याचे मनसुबे, अमेरिकन तज्ज्ञाचा दावा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वॉशिंग्टन - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना इस्लामचा शत्रू ठरवण्याचे अल कायदाचे मनसुबे आहेत. त्यामुळेच अल-कायदाचा म्होरक्या जवाहिरीच्या धमकीला ‘अधिक गांभीर्याने’ घेण्याची गरज आहे, असा दावा सीआयएशी संबंधित तज्ज्ञ ब्रूस रिडेल यांनी केला आहे. ब्रूस हे सीआयएचे माजी अधिकारी आहेत.

जवाहिरीने यंदा जारी केलेला हा पहिलाच व्हिडिआे आहे. त्यात भारतीय उपखंडात अल-कायदाची शाखा सुरू करण्याची घोषणा करण्यात आली आहे. पाकिस्तानशी या संघटनेचा संबंध असल्याने भारताला याचा धोका निर्माण झाला आहे. रिडेल म्हणाले, भारत सरकारने ही धमकी अतिशय गांभीर्याने घेतली पाहिजे. अमेरिका आणि अफगाणिस्तानसोबत दहशतवादासंबंधी सहकार्य वाढवण्यावर भर दिला पाहिजे. मुंबईमध्ये २००८ मध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि अमेरिकेत दहशतवाद विरोधी सहकार्यावर अधिक भर देण्यात आल्याचे दिसून येते.

दरम्यान, अल-कायदाच्या भारतीय उपखंडातील शाखेमुळे भारताला काहीही धोका नसल्याचे मत अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाकडून व्यक्त करण्यात आले आहे. परराष्ट्र विभागाच्या प्रवक्त्या मेरी हार्फ म्हणाल्या, अल-कायदाची ही घोषणा त्यांच्यातील नवीन क्षमतेचा भाग आहे, अशा दृष्टिकोनातून आम्ही याकडे पाहत नसल्याचे हार्फ यांनी सांगितले.
पाकिस्तान-तालिबानचे समर्थन
पाकिस्तानमध्येतालिबानमधून फुटलेल्या दहशतवादी गटाने अल-कायदाच्या शाखेचे समर्थन केले आहे. या गटाचा म्होरक्या उल-अहरारने टि्वट करून सांगितले.
१२ अमेरिकींची साथ, पेंटागॉनकडून कबुली
अमेरिकेचेचार नागरिक इस्लामिक स्टेटला साथ देत असल्याचा दावा अमेरिकेचा संरक्षण विभाग असलेल्या पेंटागॉनने मान्य केला आहे. सिरियात सुमारे १०० अमेरिकी दहशतवाद्यांची साथ देत आहेत. या दहशतवादी संघटनेला युरोपियन देशांतील हजार तरूण इराक आणि सिरियात दाखल झाले आहेत.
आयएसआयएससाठी जाणाऱ्या जणांना अटक
हैदराबाद पोलिसांनी चार तरूणांना कोलकात्यामध्ये अटक केली. हे युवक दहशतवादी संघटना आयएसआयएसला साथ देण्यासाठी इराककडे जाणार होते. त्यांचे वय २३ ते २५ दरम्यानचे आहे. यातील दोन इंजिनियरिंगचे विद्यार्थी आहेत. ते आयएसआयच्या सोशल मीडियातील प्रचाराने प्रभावित झाले होते.
मुकाबल्यासाठी हवाई दल सज्ज
अल-कायदाच्या कोणत्याही आव्हानाला तोंड देण्यासाठी देशाचे हवाई दल सज्ज आहे, असे हवाई दल प्रमुख अरूप राहा यांनी म्हटले आहे. १९६५ मध्ये भारत-पाकिस्तान युद्धाला ५० वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने शुक्रवारी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. अल-कायदाच्या व्हिडिआे संदर्भात िवचारण्यात आलेल्या प्रश्नावर ते बोलत होते. अल-कायदा सारख्या संघटनेपासून सुरक्षेचा धोका आहे. परंतु देश त्याचा मुकाबल्यासाठी सज्ज आहे.