आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • US: Football That Produces Electricity When Kicked!

किकनंतर फुटबॉलमधून वीजनिर्मिती!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

वॉशिंग्टन - फुटबॉल हे आता केवळ खेळण्याचे साधन राहणार नाही तर त्यापासून वीजनिर्मितीसुद्धा करता येईल. किक मारल्यानंतर वीज तयार होईल असा ‘सॉकिट’ नावाचा फुटबॉल अभ्यासकांनी तयार केला आहे.

पाणी प्रतिरोधक ईव्हीए फोमपासून तयार करण्यात आलेल्या या फुटबॉलचा आकार सामान्य फुटबॉलपेक्षा किंचित मोठा असेल तर वजनदेखील जास्तच (481 ग्रॅम) राहील. यामध्ये हवा भरली जाणार नाही. या फुटबॉलची रचना जेसिका ओ मॅथ्यूजने कॉलेजच्या प्रकल्पासाठी केली होती. पुढील वर्षाच्या शेवटी हा अनोखा फुटबॉल बाजारात विक्रीसाठी उपलब्ध होईल.

खेळासोबतच विजेच्या संकटातून मुक्ती
जगातील सुमारे तीन अब्ज लोक फुटबॉल या खेळाशी कोणत्या ना कोणत्या स्वरूपात जुळलेले आहेत, शिवाय जगातील इतक्याच लोकांना विजेच्या संकटाचाही सामना करावा लागत आहे. कंपनीच्या मते, ऊर्जेशी संबंधित गरजा पूर्ण करणे हा या निर्मितीमागचा उद्देश आहे. फुटबॉलच्या माध्यमातून तयार झालेल्या ऊर्जेचा वापर लोक अनेक कामांसाठी करू शकतात.

फुटबॉलच्या गतीने चालतो जनरेटर
० ‘सॉकिट’ नावाचा हा फुटबॉल वास्तविकतेत पोर्टेबल जनरेटर असून याद्वारे केवळ खेळण्याचाच आनंद नव्हे तर वीजसुद्धा मिळणार आहे.
० सॉकिटमध्ये गतिज ऊर्जेचा उपयोग करण्यात आला असून ते एखाद्या ऑफ ग्रीड स्रोताप्रमाणे कार्य करते.
० फुटबॉलच्या आतमध्ये एक दोलक बसवण्यात आले आहे. ज्यामुळे फुटबॉलची गती बॅटरीशी जोडलेल्या जनरेटरला चालवण्याचे काम करते.