आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

घराभोवती साचलेला बर्फ न काढल्‍यामुळे अमेरिकेच्‍या परराष्‍ट्रमंत्री केरींना दंड

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वॉशिंग्टन- अमेरिकेमध्ये नियमांना फार महत्त्व. कुणी नियम मोडला तर दंड झालाच म्हणून समजा. मग तो कोणीही असो. याचा प्रत्यय नुकताच आला. हिमवृष्टीनंतर घराभोवती साचलेला बर्फ काढला नाही म्हणून परराष्ट्रमंत्री जॉन केरी यांना चक्क ५० डॉलर दंड ठोठावण्यात आला आहे. केरींच्या ९,१७८ चाैरस फूट घराभोवती बर्फ साचला. एकाने ऑनलाइन सिटिझन कनेक्टवर केरींच्या घराचा फोटो पाठवून दिला.
दंड भरणार: बर्फवृष्टीवेळी केरी सौदीत होते. कर्मचाऱ्यांनी दिरंगाई केली. मात्र, म्हणून केरींची जबाबदारी संपत नाही, म्हणून हा दंड. केरी हा दंड भरणार आहेत.
नियम असा: सार्वजनिक ठिकाणे स्वच्छ ठेवण्याच्या उद्देशाने प्रत्येकाने घराबाहेर साठलेला बर्फ हटवावा, असा नियम आहे. यात कुणालाही सूट नाही.