आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Us Gives More Grenades And Mortars To Israel For Gaza Offensive, Divya Marathi

गाझा नष्‍ट करण्‍यासाठी अमेरिकेने दिले इस्रायलला मोर्टार, ग्रेनेड

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वॉशिंग्टन/गाझा/ जेरूसलेम - अमेरिकेने इस्रायलला गाझापट्टी नष्‍ट करण्‍याची परवानगी दिली आहे. अमेरिकेच्या संरक्षण अधिका-याने असा दावा केल्याचे वृत्त रॉयटर या वृत्तसंस्थेने दिले आहे. मागील आठवड्यात अमेरिकेने इस्रायलला अनेक राऊंड मोर्टार आणि ग्रेनेड यांचा पुरवठा केला आहे.

इस्रायल करू शकतो शस्त्रांचा वापर
इस्रायलमध्‍ये अमेरिकेचे शस्त्रास्त्र साठा आहे. असलहा येथे असलेला साठा 'वॉर रिझर्व्ह स्टॉक अलायज इस्रायल(डब्ल्यूआरएसएआय)' या विभागाचा तो भाग आहे. त्यावर अमेरिकेच्या सैन्याचे देखरेख असते. आणीबाणीच्या काळात इस्रायल या शस्त्रांचा वापर करू शकतो. काही द‍िवसांपूर्वी इस्रायलने अमेरिकेला असलहा येथील शस्त्र मिळण्‍याबाबत विचारणा केली होती व ती अमेरिकीने दिलीही. यात 40 एमएम ग्रेनेड,120 एमएम मोर्टार राऊंड या शस्त्रांचा समावेश आहे, असे एका अधिका-यांने नाव न छापण्‍याच्या अटीवर रॉयटर्स या वृत्तसंस्थेला सांगितले. याबाबत वॉशिंग्टनमधील इस्रायली दूतावास काहीही सांगण्‍यास तयार नाही. 'आयर्न डोम' या क्षेपणास्त्रासाठी आवश्‍यक तांत्रिक अमेरिकेने या देशाला दिले आहे.

अनेकांचा बळी
23 दिवसांपासून सुरू असलेल्या इस्रायल-हमास संघर्षात 1 हजार 300 लोकांचा बळी गेला आहे. सर्व आंतरराष्‍ट्रीय प्रयत्नानंतरही दोन देशांमधील संघर्ष थांबलेले नाही. मागील सहा वर्षांच्या इतिहासात आता चालू असलेला इस्रायल-गाझा संघर्षाची तीव्रता सर्वाधिक आहे.

पॅलेस्टाइनचे नेते शांततेसाठी जाणार काहिराला
पॅलेस्टाइनचे नेते गाझापट्टी शांतता प्रस्थापित व्हावी यासाठी काहिराला जाणार आहेत. तेथे ते आंतरराष्‍ट्रीय नेत्यांशी चर्चा करतील. तसेच इस्रायल- हमास शस्त्रसंधीसाठी त्यांचे प्रयत्न असेल.

पुढील छायाचित्रांमध्‍ये पाहा गाझाची सद्य:स्थिती....