आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Us Gurudwara Attacker Had 9 11 Attack Tatoo On His Hand

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

गुरुद्वारामधील हल्‍लेखोराच्‍या हातावर होता 9/11 चा टॅटू

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

न्‍यूयॉर्क- अमेरिकेतील विस्‍कोसिन येथील गुरुद्वारामध्‍ये झालेल गोळीबाराचा जगभरातून निषेध होत आहे. या गोळीबारात 7 जणांचा मृत्‍यू झाला. या हल्‍ल्‍याचा एफबीआय या तपास संस्‍थेने घटनेची चौकशी सुरु केली आहे. एकीकडे स्‍थानिक पोलिसांनी हा देशांतर्गत हिंसेचा प्रकार असल्‍याचे म्‍हटले आहे. तर दुसरीकडे या घटनेचा 9/11 च्‍या हल्‍ल्‍याशी संबंध जोडला जात आहे. हल्‍लेखोराच्‍या हातावर 9/11 चा टॅटू होता. यावरुन तपासाला वेगळेच वळण मिळाले आहे.
गुरुद्वारामध्‍ये झालेल्‍या गोळीबारात 30 पेक्षा जास्‍त जण जखमी झाले आहेत. हल्‍लेखोराला ठार मारण्‍यात आले. तो श्‍वेतवर्णीय होता. त्‍याच्‍या हातावर 9/11 चा टॅटू होता. गुरुद्वाराच्‍या जवळपासच तो राहणारा होता, अशी माहिती देण्‍यात आली आहे. त्‍याच्‍या घराचा शोध घेण्‍यात येत आहे. या घटनेनंतर अमेरिकेचे राष्‍ट्रपती बराक ओबामा यांनी परिस्थितीचा आढावा घेतला.
अमेरिकेतील गुरुद्वारात बेछूट गोळीबार; आठ ठार
पहिले वाटला \'स्पेशल इफेक्ट\' नंतर अचानक अंधाधुंद गोळीबार