वॉशिंग्टन- गेल्या महिन्यात इस्लामिस्ट मिलिटंट ग्रुप बोको हरामने अपहरण केलेल्या सुमारे 200 शाळकरी मुलींची सुटका करण्यासाठी अमेरिकेने सुरक्षा आणि लष्करी तज्ज्ञांची टीम नायजेरियाला पाठवली आहे.
पश्चिम आफ्रिकन प्रांतातील चिबुक येथील एका गावात 223 शाळकरी मुली अंतिम परिक्षा देण्यासाठी आल्या होत्या. यावेळी बोको हराम संघटनेच्या दहशतवाद्यांनी त्यांचे अपहरण केले. तेव्हापासून नायजेरियन सरकार मुलींचा शोध घेत आहे. परंतु, सरकारला कोणतेही यश आलेले नाही. त्यामुळे अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा आणि परराष्ट्रमंत्री जॉन केरी यांनी सुरक्षा आणि लष्करी तज्ज्ञांची टीम पाठविण्याचा निर्णय घेतला आहे. या प्रकरणी अमेरिकेने हस्तक्षेप करावा अशी मागणीही करण्यात येत होती.
नायजेरियाची राजधानी अबुजा येथे अमेरिकेची टीम थांबणार असून नायजेरियन सरकारच्या सुरक्षा संस्थांच्या मदतीने काम करणार आहे. यासंदर्भात बराक ओबामा म्हणाले, की आम्ही तज्ज्ञांची टीम नायजेरियाला पाठविली आहे. त्यात लष्करी, कायदा आणि सुरक्षा तसेच इतर सुरक्षा संस्थांचे अधिकारी-कर्मचारी आहेत. अपहरण करण्यात आलेल्या मुलींना कोठे ठेवण्यात आले आहे, याचा शोध लावला जाईल. त्यानंतर त्यांच्या सुटकेचे प्रयत्न केले जातील.
अपहरणासंदर्भात बोको हरामचा नेता काय म्हणाला, वाचा पुढील स्लाईडवर