आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • US Human Right Group Declares Bounty For Serving Summons To Modi

अमेरिकेत मोदींना समन्स देणाऱ्याला 6 लाख देण्याची घोषणा, ओबामा प्रशासन बचावात

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फोटो- अमेरिकी जस्टीस सेंटरचे कायदे सल्लागार गुरपतवंतसिंह पन्नून.)
न्युयॉर्क (अमेरिका)- मानवाधिकार संस्था अमेरिकन जस्टिस सेंटर (AJC) ने जाहीर केले आहे, की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जो व्यक्ती न्यायालयाचा समन्स देईल त्याला 10 हजार डॉलर (सुमारे 6 लाख रुपये) बक्षिस दिले जाईल. 2002 मधील गुजरात दंगल प्रकरणी नरेंद्र मोदी यांच्याविरुद्ध याचिका दाखल करुन AJC ने समन्स काढला आहे. पुरावा म्हणून या व्यक्तीला समन्स दिल्याचा व्हिडिओ द्यावा लागेल, असे AJC ने सांगितले आहे.
दरम्यान, अमेरिकेने नरेंद्र मोदी यांचा बचाव केला आहे. राजकीय संरक्षण प्राप्त असल्याने त्यांच्याविरुद्ध अमेरिकेत कोणत्याही न्यायालयात खटला चालवला जाऊ शकत नाही, असे सांगितले आहे.
नरेंद्र मोदींना समन्स देण्यावर बक्षिस
गुजरातमध्ये दंगल झाली तेव्हा नरेंद्र मोदी मुख्यमंत्री होते. यासंदर्भात AJC ने न्युयॉर्कच्या सदर्न डिस्ट्रिक्टच्या न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यानंतर न्यायालयाने समन्स काढला होता. त्यात 21 दिवसांच्या आत मोदींनी आपली बाजू मांडावी असे सांगण्यात आले आहे.
न्यायालयाचा हा निर्णय मोदींच्या अमेरिकी दौऱ्याच्या आधी आला आहे. AJC ने सांगितले आहे, की न्यायालयाचा समन्स जो व्यक्ती मोदींना सोपवेल त्याला तब्बल 10 हजार डॉलरचे बक्षिस दिले जाईल. AJC चे कायदे सल्लागार गुरपतवंस सिंह पन्नून यांनी सांगितले आहे, की जो व्यक्ती मोदींना समन्स देण्याचा व्हिडिओ पुराव्यादाखल देईल त्याला बक्षिसाची रक्कम दिली जाईल.
सूत्रांकडून समजले आहे, की नरेंद्र मोदी यांना समन्स देण्यासाठी AJC ने काही लोकांना भाड्याने घेतले आहे. मोदींना समन्स देण्यासाठी सर्व पर्यायांवर विचार केला जात आहे. मोदींच्या दिशेने समन्सचा कागद फेकलाही जाऊ शकतो.
अमेरिकेने केला आहे बचाव
नरेंद्र मोदी यांच्याविरुद्ध समन्स जारी करण्यावर ओबामा प्रशासनाने आक्षेप घेतला आहे. अमेरिकेने म्हटले आहे, की नरेंद्र मोदी एका देशाचे प्रमुख म्हणून दौऱ्यावर येत आहेत. यात त्यांना कायदेशीर स्वातंत्र्य प्राप्त आहे. यावेळी त्यांना समन्स दिला जाऊ शकत नाही. त्यांच्यावर खटलाही चालवला जाऊ शकत नाही.
अमेरिकी न्यायालयाने जारी केलेल्या समन्सची कॉपी... बघा पुढील स्लाईडवर