आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Us Intelligence Agency Build New Spy Search Engine Named Icreach

अमेरिकेने बनवले गुगलप्रमाणे सर्च इंजिन

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वॉशिंग्टन - अमेरिकेची गुप्तचर संघटना नॅशनल सेक्यूरिटी एजन्सीने (एनएसए) गुगल प्रमाणेच एक सर्च इंजिन तयार केले आहे. यामध्ये जगातील कोट्यवधी लोकांची अब्जावधी माहिती साठवण्यात आली आहे. द इंटरसेप्ट वेबसाईटने एनएसएच्या या जासूसी प्रकल्पाबद्दल खुलासा केला आहे. यामुळे अमेरिकेच्या सैन्याने इंटरसेप्ट वेबसाईटच बॅन केली आहे. मिल्ट्री, वायू आणि नौदलाच्या सर्व गटातील अधिकार्‍यांना ही वेबसाईट न उघडण्याचे आदेश देण्यात आले आहेत.तसेच जर असे करताना कोणी आढळल्यास त्याला गंभीर परिणाम भोगावे लागतील अशी चेतावणीही अमेरिकेच्या सैन्याकडून देण्यात आली आहे.
'आयसीरीच' नावाच्या या सर्च इंजिनमध्ये 850 अब्जचा डाटा आहे. हा डाटा जमिनीवर असलेल्या सात अब्ज लोकसंख्येच्याही 100 पटीने जास्त आहे. वेबसाईटने अमेरिकेच्या माजी सिक्यूरिटी कॉन्ट्रॅक्टर एडवर्ड स्नोडेनने दिलेल्या माहितीच्या आधारे याचा खुलासा केला होता.

गुगलसर्च प्रमाणे सोपे आहे 'आयसीरीच'
उदाहरण - डेविड गौथम नावाचा व्यक्ती एनएसएच्या रडारवर आहे. एनएसए एजंट आयसीरीच आयडीने लॉग इन करेल. डेविड गौथमचे नाव टाकून सर्च करेल. आणि त्याच्यासमोर खालील माहिती येईल.
लोकेशन - डेविड कोठे - कोठे गेला होता. किती दिवस थांबला
ईमेल : त्याने कधी, कोणाला, काय आणि किती ईमेल पाठवले
कॉल्स: कोणत्या नंबरवर किती कॉल केले
एसएमएस: कोणत्या नंबरवरून कोणाला, कधी आणि काय काय मॅसेज केले
फॅक्स : कोणत्या नंबरवर कोणती माहिती फॅक्स केली.