बैरूत - जेम्स फॉली या अमेरकिन पत्रकाराचे शिरकाण झाल्याच्या दोनच आठवड्यांनंतर इस्लामकि स्टेट या दहशतवादी संघटनेने स्टीव्हन सॉटलॉफ नावाच्या अन्य एका अमेरकिन पत्रकाराचीही अशीच निर्घृण हत्या केल्याचे उघड झाले आहे. अमेरिकेने हवाई हल्ले थांबवले नाहीत तर आमचे सुरे तुम्हा लोकांचा शिरच्छेद करत राहतील, असा इशारा दहशतवाद्यांनी दिला आहे.
दहशतवाद्यांनी त्याचे चित्रीकरणही प्रसिद्ध केले. सॉटलॉफ याच्या आईने काहीच दिवसांपूर्वी त्याचे प्राण घेण्यात येऊ नयेत, अशी याचना केली होती. मात्र, त्याची निर्दयपणे हत्या करून त्याचे चति्रीकरणही प्रसिद्ध केले आहे. सॉटलॉफ याच्या कुटुंबीयांनी हे चति्रीकरण पाहिले आहे. कुटुंबाला या दु:खद प्रकाराची माहिती मिळाली आहे. त्यामुळे त्यांच्यावर शोककळा पसरली आहे. सध्या या कठीण काळामध्ये कुटुंबाकडून प्रसारमाध्यमांमध्ये कोणतीही प्रतकि्रिया दिली जाणार नाही. राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी ऑगस्टच्या सुरुवातीला इस्लामकि स्टेट दहशतवादी संघटनेच्या खात्म्यासाठी हवाई हल्ल्याचे आदेश दिले होते.
इराकमध्ये कारवाई सुरू आहे.
‘अमेरिकेस दुसरा संदेश’ :टाइम व फॉरेन पॉलिसी या मासिकांसाठी काम करणाऱ्या सॉटलॉफ हा ३१ वर्षीय पत्रकार मियामी येथील राहणारा होता. सॉटलॉफ हा सिरियामध्ये वार्तांकन करीत असताना ऑगस्ट २०१३ मध्ये बेपत्ता झाला होता. सॉटलॉफ याचा शिरच्छेद करण्यात आल्याच्या चति्रीकरणास ‘अमेरकिेस दुसरा संदेश’ असे नाव देण्यात आले आहे. या चित्रिकरणामध्ये आयसिसने आता डेव्हडि कॅवथॉर्न हेन्स या ब्रिटशि नागरिकासही ठार मारण्याचा इशारा दिला आहे.