आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • US Man Kills Girlfriend's Baby For Crying During Football Game

फुटबॉल सामना पाहण्‍यासाठी प्रेयसीच्‍या तान्‍हुल्‍याची केली हत्‍या

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

फुटबॉलचा सामना पाहताना प्रेयसीच्‍या तान्‍हुल्‍याच्‍या रडण्‍यामुळे संतापलेल्‍या तरुणाने चक्‍क त्‍याचा जीव घेतल्‍याची हृदयद्रावक घटना अमेरिकेत घडली आहे. ही घटना ओक्लाहोमा येथे 7 डिसेंबरला घडली होती. याप्रकरणाचा आता छडा लागला. या निष्‍ठूर प्रियकराला अटक केली असून त्‍याने गुन्‍हा कबूल केला आहे.

ट्रेव्‍हेन्‍स वॉकर असे या 22 वर्षीय तरुणाचे नाव आहे. त्‍याचे एका विवाहित महिलेसोबत सूत जुळले होते. तिला एक पाच महिन्‍यांचा मुलगा आहे. कामानिमित्त बाहेर जायचे असल्‍याने तिने वॉकरला चिमुकल्‍याला सांभाळण्‍यासाठी बोलावले होते. तो फुटबॉलचा सामना टीव्‍हीवर पाहत होता. त्‍याचवेळी चिमुकला रडू लागला. वॉकरने त्याला शांत करण्याचा प्रयत्न केला. परंतु, त्‍याचे रडणे काही थांबत नव्‍हते. हळूहळू त्‍याचे रडणे वाढले. त्‍यामुळे वॉकर संतापला. त्‍याने त्‍याला एवढ्या जोरात पकडले की त्‍याचा श्‍वास कोंडला आणि मेंदूत रक्तस्‍त्राव झाला. एवढेच नव्‍हे तर त्‍याने त्‍याला दोन फुटांवरुन खाली फेकले. चार तासानंतर कुटुंबातील अन्य व्यक्तींना पाच महिन्याचा मुलगा निर्जीव अवस्थेत आढळला. त्याच्या कानातून रक्त येत होते. तसेच त्याच्या डोक्यावरही जखम झाली होती. चिमुकल्‍याला रुग्णालयात दाखल केले. परंतु, त्‍याचा आधीच मृत्‍यू झाला होता.

पोलिसांनी वॉकरला अटक केली आहे. त्‍याने सुरुवातीला आरोप फेटाळला. परंतु, नंतर गुन्‍हा मान्‍य केला. एका शेजा-याने त्‍याला संतापाच्‍या भरात कोणाशी तरी बोलताना ऐकले होते. तान्‍हुला रडणे थांबत नव्‍हता म्‍हणून वॉकर संतापला होता.