आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Us Mosque Gutted In Fire In A Suspected Arson Attack

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

गुरुद्वारात गोळाबारानंतर आता अमेरिकेत मशिद जाळली

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

न्‍यूयॉर्क- अमेरिकेतील विस्‍कोसिन येथे गुरुद्वा-यात हल्‍ला केल्‍यानंतर आता एका मशिदीला लक्ष्‍य करण्‍यात आले आहे. दक्षिण पश्चिम मिसुरी येथे काही अज्ञात जणांनी एक मशिद जाळली.
मिसुरी येथ्‍ज्ञील 'इस्‍लामिक सोसायटी ऑफ जॉपलीन'वर जमावाने हल्‍ला चढवून आग लावली. आग लागली त्‍यावेळी मशिदीमध्‍ये कोणीही नव्‍हते. घटनेची एफबीआयने चौकशी सुरु केली आहे. आगीच्‍या कारणांचा शोध घेण्‍यात येत आहे. आग कशामुळे लागली, हे स्‍पष्‍ट झाल्‍यानंतर चित्र स्‍पष्‍ट होईल. कोणत्‍याही धार्मिक स्‍थळावरील हल्‍ला गांभीर्याने घेण्‍यात येईल. दोषींवर कडक कारवाई करण्‍यात येईल, असे अमेरिकेने स्‍पष्‍ट केले आहे.
दोन दिवसांपूर्वी अमेरिकेत विस्‍कोसिन येथील गुरुद्वारामध्‍ये गोळीबाराची घटना घडली होती. त्‍यात 7 जणांचा मृत्‍यू झाला होता. त्‍यानंतर आता मशिदीला लक्ष्‍य करण्‍यात आले. दोन्‍ही घटनेनंतर आता अमेरिकेतील धार्मिक स्‍थळांना संरक्षण देण्‍याची मागणी करण्‍यात आली आहे.
गुरुद्वारात गोळीबार करणारा हल्लेखोर अमेरिकी सैन्यात होता
अमेरिकेतील गुरुद्वारात बेछूट गोळीबार; आठ ठार