आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ओबामांच्या या सवयींना कंटाळून मिशेल घेणार घटस्फोट ?

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मिशल ओबामा या बराक ओबामांना घटस्फोट देणार आहेत, अशी माहिती नॅशनल इन्केवायरर या अमेरीकन वेबसाइटने दिली आहे. मिशल ओबामा यांच्या 50 व्या वाढदिवसाच्या एक दिवस अगोदर नॅशनल इनक्वायररने ही माहिती दिली आहे.

लिवाइन आणि लिओन वॅगनर यांनी त्यांच्या अहवालात अमेरिकेचे अध्यक्ष आणि त्यांची पत्नी आता वेगळे होणार असून मिशल यांनी त्यांच्या वकीलाशीही या विषयावर चर्चा केली असल्याचा दावा केला आहे. ओबामा अमेरिकेचे अध्यक्ष असल्याने 2016 पर्यंत शांत राहण्याचा निर्णय मिशेलनी घेतला आहे. आता त्या व्हाइट हाऊसमध्येच वेगळ्या राहणार असल्याचा दावाही या अहवालात करण्यात आला आहे.

ओबामांच्या फ्लर्टिंग वागणूकिने मिशल त्रस्त झाल्या आहेत. गेल्यावर्षी नेल्सन मंडेलांच्या शोक सभेतही ओबामा डेन्मार्कच्या पंतप्रधान हेले थार्निग यांच्यासोबत सेल्फी फोटो काढताना दिसले होते. आंतरराष्ट्रीय माध्यमांनी हा फोटो प्रकाशीत केल्यानंतर ओबामा अडचणीत आले होते.

या फोटोमध्ये ओबामा हेले यांच्या सोबत हसत होते आणि फोटो काढण्यासाठी फोन व्यवस्थित करत होते. या फोटोत मिशेल रागीट नजरेने ओबामा यांच्याकडे पाहताना दिसत आहेत. त्यानंतर मिशेल यांनी आपली नजर प्रक्षकांकडे वळवली. मला काही फरक पडत नाही, असे दाखवण्याचा प्रयत्न यावेळी त्यांनी केला खरा पण मिशल हेलेसोबत हसून गप्पा करणा-या ओबामांवर चिडल्या होत्या.

ओबामा आणि मिशेल यांच्या नात्यातील दूराव्यासाठी कारणीभूत ठरू शकणारे काही फोटो पाहण्यासाठी पुढील स्लाइडवर क्लिक करा...