Home »International »Other Country» US President Barack Obama To Have Two Swearing-In Ceremonies

ओबामा राष्‍ट्रपतिपदाची शपथ दोन दिवस घेणार

वृत्तसंस्था | Jan 06, 2013, 01:07 AM IST

  • ओबामा राष्‍ट्रपतिपदाची शपथ दोन दिवस घेणार

वॉशिंग्टन- अमेरिकेचे राष्‍ट्रपती बराक ओबामा या वेळी दोन वेळा शपथ घेतील. एखादा राष्‍ट्रपती दोनदा शपथ घेण्याची ही घटना अमेरिकी इतिहासात सातव्यांदा घडत आहे. घटनेनुसार राष्‍ट्रपतीला 20 जानेवारी रोजीच शपथ घ्यावी लागते. याआधी 1985 मध्ये रोनाल्ड रिगन यांच्या दुस-या कार्यकाळाच्या वेळी असा योग आला होता. अमेरिकेत रविवारी शपथविधी समारंभ होऊ शकत नाही. कारण या दिवशी न्यायालयांसह इतर सरकारी कार्यालयांना सुटी असते, परंतु त्या दिवशी रविवार आला असेल तर अत्यंत साधेपणाने आणि दुस-या दिवशी 21 जानेवारी रोजी सार्वजनिकरीत्या शपथविधी होतो.


शनिवारी संसदेत उपराष्‍ट्रपती जो बायडन यांनी ओबामा दुस-यांदा राष्‍ट्रपती झाल्याची औपचारिक घोषणा केली. या वेळी 20 जानेवारी रोजी रविवार आहे. त्यामुळे राष्‍ट्रपती शपथविधी समितीनुसार राष्‍ट्रपती बराक ओबामा आणि उपराष्‍ट्रपती जो बाइडन यांना अधिकृतरीत्या 20 जानेवारी रोजीच शपथ दिली जाईल. दुस-या दिवशी राजधानीतील वेस्ट फ्रंटवर सार्वजनिक शपथविधी समारंभ होईल. दोन्ही दिवस ओबामा यांना सरन्यायाधीश जॉन जी. रॉबर्ट्स ज्युनियर तथा
उपराष्ट्रपतींना सर्वोच्च न्यायालयाच्या सहन्यायमूर्ती सोनिया सोटोमेयर या शपथ देतील.योगायोगाने यंदा 21 जानेवारी रोजी मार्टिन ल्यूथर किंग ज्युनियर डेदेखील आहे. दुस-यांदा अमेरिकी राष्‍ट्रपतींना या दिवशी शपथ दिली जात आहे. याआधी 1997 मध्ये बिल क्लिंटन यांचा दुसरा शपथविधी या दिवशी झाला होता.


* दुस-यांदा शपथ घेण्यासाठी उभा ठाकेन त्या वेळी स्वत:चा मोठा सन्मान होत असल्याची जाणीव होईल.’’
बराक ओबामा, अमेरिकेचे राष्‍ट्रपती

Next Article

Recommended