आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • US President Barak Obama Ask China To Support In Fight Against Terrorism

अतिरेक्यांविरुद्ध चीनने सहकार्य करावे, बराक ओबामांचे आवाहन

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बीजिंग - दहशतवादाविरुद्धच्या लढाईत चीनने अमेरिकेला सहकार्य करावे. दहशतवाद्यांसाठी हा प्रदेश सुरक्षित ठिकाण होऊ नये, याची खबरदारी घेतली जायला हवी, असे आवाहन राष्ट्राध्यक्ष बराक आेबामा यांनी केले आहे. आशिया-प्रशांत आर्थिक सहकार्य (एपेक) संघटनेच्या शिखर बैठकीसाठी सध्या आेबामा चीन दौ-यावर आहेत. त्या निमित्ताने ते बोलत होते.
दहशतवाद ही जागतिक समस्या बनली आहे. अमेरिकेचा त्याला विरोध आहे. दहशतवादाच्या विरोधातील सहकार्य वाढीला प्रोत्साहन मिळावे, अशी देशाची भूमिका आहे. त्यासाठी चीनने सहकार्य करावे, असे आेबामा म्हणाले. कनमिंग शहरातील रेल्वेस्थानकावर चाकूहल्ल्याची घटना ताजी आहे. हिंसाचाराच्या घटनात अनेकांनी पती, पत्नी, मुले गमावली. त्यांची दु:खे मोठी आहेत. त्यांनी आपला प्रेमाचा व्यक्ती गमावला आहे. अशा प्रकारचा कोणताच दहशतवाद पसरू नये, याची खबरदारी घेणे गरजेचे आहे. चीनमध्ये इटीआयएम ही संघटना पाय पसरू लागली आहे. अफगाणिस्तानातील काही प्रदेशात इटीआयएमचे वर्चस्व दिसून येते. महासत्ता म्हणून अमेरिका आणि चीन यांचे जमत नाही, हे जगजाहीर आहे, परंतु दहशतवादासारख्या मानवी संकटाला परतावण्यासाठी दोन्ही देशांनी एकत्र यायला हवे. परस्परांना सहकार्य केल्यास ही समस्या मुळावर येणार नाही. त्यासाठी दहशतवादीविरोधी लढाईत पुढे यावे लागेल.