आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • US \'ricin\' Letter Suspect Charged Over Obama \'threat\'

ओबामांना विषारी पत्रे पाठवणा-यास अटक

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

वॉशिंग्टन- राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा आणि सिनेटरला पत्रासोबत विषारी पदार्थ पाठवणा- या व्यक्तीला अटक करण्यात आली. एफबीआयने त्याच्या मुसक्या आवळल्या आहेत पॉल केव्हिन कुर्टिस (45) असे अटकेतील व्यक्तीचे नाव आहे. त्याला बुधवारी अटक करण्यात आली असून तो मूळचा मिसिसिपी भागातील कोरिन्थ भागातील आहे. त्याने तीन पत्रे पाठवली होती. त्यात रिसिन नावाचा अत्यंत विषारी घटक सापडला आहे. राष्ट्राध्यक्ष ओबामा, सिनेटर रॉजर विकर आणि मिसिसिपीच्या न्यायाधीशांना ही पत्रे पाठवण्यात आली होती. एफबीआय आणि दहशतवाद प्रतिबंधक दल यांच्या संयुक्त कारवाईत कुर्टिसला अटक करण्यात आली आहे. बोस्टन मॅरेथॉन आणि तीन पत्रे यांच्यात संबंध नसल्याचे एफबीआयकडून स्पष्ट करण्यात आले आहे. आम्ही काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करत होतो, परंतु कोणीही ऐकायला तयार नव्हते. त्यामुळे कोणाचा तरी मृत्यू निश्चित होता, असे त्या व्यक्तीने पत्रातून म्हटले आहे, असा दावा स्थानिक टीव्ही वाहिनीच्या वृत्तातून करण्यात आला आहे.