आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हाफिज सईदला अमेरिका कोर्टात खेचणार

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

वॉशिंग्टन - 26/11 चा मास्टरमाइंड आणि लष्कर-ए-तोयबाचा म्होरक्या हाफिज सईदविषयीची माहिती गोळा करण्याचे काम सुरू आहे. त्याआधारे सईदला न्यायालयात खेचण्यात येणार असल्याचे अमेरिकेकडून स्पष्ट करण्यात आले आहे. सईदसंबंधीची माहिती देणा-यास अमेरिकेने 53 कोटी रुपयांचे बक्षीस जाहीर केले आहे. परंतु शुक्रवारी सईदने एका मुलाखतीमध्ये अमेरिकेला जुमानत नसल्याचे सांगितले होते. त्यानंतर पत्रकार परिषदेत गृहखात्याच्या प्रवक्त्या व्हिक्टोरिया नूलँड यांनी देशाची भूमिका मांडली आहे. अमेरिका किंवा परदेशी न्यायालयात सईदविरुद्ध खटला चालवता येऊ शकेल, असे नूलँड म्हणाल्या.