आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • US Seeks 30 Year Sentence For David Headley Aide Tahawwur Rana In Terror Plot

तहव्वुर राणाला होणार 30 वर्षांची शिक्षा; शिकागो कोर्ट आज सुनविणार शिक्षा

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वाशिंग्टन- मुंबई हल्ल्यातील आरोपी डेव्हिड हेडलीचा साथीदार तहव्वुर राणाच्या विरोधात आज अमेरिकेतील शिकागो कोर्टात शिक्षा सुनविण्यात येईल. राणावर डेन्मार्कमधील एका वृत्तपत्रावर दहशतवादी हल्ला करण्याचा कट रचल्याचा व लष्कर-ए-तोयबाला मदत केल्याचा आरोप आहे.
५२ वर्षीय राणा अमेरिकेतील संघीय ग्रेड ज्यूरींना डेन्मार्कमधील ‘जिलांद्स पोस्टन’ वर जून 2011 मध्ये दहशतवादी हल्ला करण्याचा व लष्कर-ए-तोयबाला मदत पोहचवत असल्याप्रकरणी दोषी आढळला होता. सरकारी पक्षाने राणा एक दहशतवादी असून त्याने मुंबईत हल्ला करण्यासाठी दहशतवादी हल्ला करण्यासाठी मदत केल्याचा आरोप उचलून धरला. तर राणाच्या वकीलाचे त्याचा बचाव करताना राणावर दया दाखवावी कारण त्याची त्याच्या मित्राकडून फसवणूक झाली आहे. मात्र, न्यायाधिशांनी राणाच्या वकीलाचे अपील फेटाळून लावले होते.
राणाला 26/11 मुंबई दहशतवादी हल्ल्यातील संशयित आरोपी म्हणून 2009 मध्ये अटक करण्यात आली होती. मात्र, या आरोपात त्याला सोडून देण्यात आले. त्यानंतर भारतीय चौकशी पथकाने मुंबई हल्ल्यातील सहभागाबाबत परत चौकशी करणयाची मागणी केली होती. कार्यकारी अमेरिकी अॅटर्नी गॅरी शॅपिरो यांनी सरकारकडून शिकागो कोर्टाला आरोपपत्र देऊन राणाला 30 वर्षांची शिक्षा सुनाविण्याची मागणी केली आहे. मुंबई हल्ल्याप्रकरणी राणाला अटक करण्यात आली होती. मात्र शिकागो कोर्टाने त्याला निर्दोष सोडून दिले होते.