आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • US Seeks 30 yr Jail For Mumbai Terror Suspect Tahawwur Rana

अमेरिकेने केली राणाला 30 वर्षांच्या कैदेची मागणी

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

वॉशिंग्टन - दहशतवादी डेव्हिड हेडलीचा पाकिस्तानी-कॅनडीयन सहकारी तहव्वूर राणा याला 30 वर्षांच्या कैदेची शिक्षा करण्याची मागणी अमेरिकी सरकारने केली आहे. डेन्मार्कच्या एका वृत्तपत्रावर दहशतवादी हल्ला करण्याचा कट रचणे आणि लष्कर-ए-तोयबाला मदत करण्याचा आरोप त्याच्यावर आहे. फेडरल ग्रँडच्या न्यायाधीशांसमोर 52 वर्षीय राणा दोषी असल्याचे आढळून आले होते. ‘जिलांद्स पोस्टन’ या वृत्तपत्रावर जून 2011 मध्ये हल्ला करण्याचा कट त्याने रचला होता. राणा मुंबईवरील हल्ल्यातील दोषी आहे. त्याला 2009 मध्ये अटक करण्यात आली होती.