आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • US Senate Panel Releases 13 Videos Of Syria Chemical Attack

सिरि‍यात रासायनिक हल्‍ल्याचे व्हिडिओ प्रसारीत, अमेरिकेचा दबाव वाढला

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

वॉशिंग्टन - अमेरिकेच्‍या गुप्‍तचर विभागाशी संबंधित असलेल्‍या लोकप्रतिनिधींच्‍या समितीने सिरियात करण्‍यात आलेल्‍या रासायनिक हल्‍ल्‍याशी संबंधित चित्रफिती दाखविण्‍यास मंजूरी दिली. एकूण 13 चित्रफिती दाखविण्‍यात आल्‍या असून त्‍या सर्वप्रथम सीएनएन या वृत्तवाहिनीने प्रसारीत केल्‍या. चित्रफिती प्रसारीत झाल्‍यानंतर अमेरिकेने आता सिरियावर हल्‍ला करण्‍यासाठी दबाव वाढवला आहे.

रासायनिक हल्‍ल्‍याशी संबंधित चित्रफिती सीएनएन वाहिनीकडे सर्वप्रथम लीक झाल्‍या. हा सिरियावर हल्‍ला करणसाठी दबाव वाढविण्‍याच्‍या डावपेचांचाच एक भाग असल्‍याचे जाणकार मानतात. सिरियातील दमास्कस येथे 21 ऑगस्ट रोजी राष्ट्राध्यक्ष बाशर अल असद यांच्या सैनिकांनी रासायनिक हल्‍ला केला. त्‍यात 1429 नागरिकांचा मृत्‍यू झाल्‍याचा आरोप आहे. असद यांनी मात्र हे आरोप फेटाळले आहेत.