आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अमेरिकेची युक्रेनला मदत; घातक शस्त्रास्त्रे पुरवणार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वॉशिंग्टन - रशिया समर्थक फुटीरतावाद्यांशी संघर्ष करत असलेल्या युक्रेनला अमेरिका लष्करी मदत देण्याची तयारी करत आहे. अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री जॉन केरी गुरुवारी युक्रेनचे राष्ट्रपती पेट्रो पोरोशेंको आणि अन्य अधिकार्‍यांशी या विषयावर चर्चा करतील. तथापि, रशियाच्या लष्कराला लढा देणे शहाणपणाचे लक्षण नसल्याचे अमेरिकेचे राष्ट्रपती बराक ओबामा यांनी म्हटले आहे. दरम्यान, पूर्वी युक्रेनच्या दोनेत्सकमध्ये फुटीरतावाद्यांसोबतच्या संघर्षात युक्रेनच्या पाच जवानांचा मृत्यू झाला आहे. ‘द न्यूयॉर्क टाइम्स’ या अमेरिकेतील वर्तमानपत्राच्या अहवालानुसार, अमेरिका आणि युक्रेनमधील कराराबाबत अमेरिकेतील आठ माजी वरिष्ठ अधिकारी स्वतंत्र अहवाल जारी करतील.

हे अधिकारी युक्रेनला घातक क्षेपणास्त्रे, ड्रोन आणि तीन अब्ज डॉलरची शस्त्रे देण्याबाबतची शिफारस अमेरिकेला करतील. प्राप्त माहितीनुसार, ज्वाइंट चीफ ऑफ स्टाफचे अध्यक्ष आणि नाटोचे लष्करी कमांडरसुद्धा युक्रेनला घातक शस्त्रे देण्याच्या बाजूने आहेत. अमेरिकेच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार सुसेन राइस युक्रेनला हत्यारे देण्याच्या विरोधात होत्या. मात्र, आता त्या तयार झाल्या आहेत, अशी माहिती अमेरिकेतील एका लष्करी अधिकार्‍याने दिली.

देबाल्त्सेव्हमध्ये संघर्ष पेटला
देबाल्त्सेव्हमध्ये फुटीरतावादी आणि युक्रेनच्या लष्करादरम्यान शनिवारी आणि रविवारी जोरदार संघर्ष झाला. युक्रेन सरकार आणि रशिया समर्थक फुटीरतावाद्यांदरम्यानची शांती वार्ता फिसकटल्यानंतर तत्काळ हे संघर्ष सुरू झाले. देबाल्त्सेव्हची लोकसंख्या सुमारे २५ हजारांच्या घरात आहे आणि यावर युक्रेनचे नियंत्रण आहे. दोनेत्स्क आणि लुहांस्कच्या भागातून फुटीरतावाद्यांनी गोळीबार केला.

हवे तर वेगळे व्हा, परंतु लष्करी संघर्ष नको : ओबामा
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी युक्रेनच्या पूर्वोत्तर भागात रशिया समर्थक फुटीरतावादी आणि लष्करातील संघर्षावर चिंता व्यक्त केली होती. युक्रेनमध्ये लष्करी कारवाई करण्यापेक्षा दोन्ही देश वेगळे होण्यासाठीच्या सर्व पर्यायांवर आम्ही विचार करत असल्याचेही ते म्हणाले.