आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आजारी मुलाची एव्हरेस्ट चढाई, 17 हजार 600 फूट चढाईत यश

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

न्यूयॉर्क - डाऊन सिंड्रोम असलेल्या अमेरिकेतील पंधरावर्षीय मुलगा जिद्दीची गाथा लिहिणार आहे. त्याने एव्हरेस्ट सर करण्याचा दृढसंकल्प केला आहे. संकल्प करूनच तो थांबला नाही तर आजारी असूनही या बहाद्दराने आतापर्यंत 17 हजार 600 फुटांची चढाई यशस्वीरीत्या पूर्ण देखील केली आहे.
एली रीमर असे या बहाद्दराचे नाव आहे. किशोरवयीन एलीला विचित्र आजार झाला आहे. त्या अवस्थेत गेल्या महिन्यात त्याने 17 हजार 600 फुटांची चढाई केली. त्यासाठी दोन आठवडे त्याला चालावे लागले होते. 113 किलोमीटर अंतर कापून तो सर्वात उंच बेस कँपवर दाखल झाला. हा बेस कँप जगातील सर्वात उंच शिखरावरील आहे. काही गिर्यारोहकांच्या टीमसोबत एली आहे. एलीची काळजी वाटत असल्याने त्याचे वडील जस्टीन रीमरदेखील त्याच्यासोबत आहेत. एलीच्या प्रकृतीत पूर्वीपेक्षा कमालीची सुधारणा झाली आहे. त्याने फार मोठी कामगिरी केली आहे. अमेझिंग आहे. इतरांना यातून प्रेरणा मिळेल, असा विश्वास रीमर यांनी व्यक्त केला.