आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • US Troops Poised Respond North Korean Threat Kim Jong Un Deploys Ballistic Missile Striking Range Japan Said Nuclear

उत्तर कोरिया करणार अण्वस्त्र हल्ला; दक्षिण कोरिया हादरली, अमेरिका सरसावली

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सेऊल- कोरियन द्वीपकल्पात तणावाची स्थिती कायम असून, उत्तर कोरियाने अण्वस्त्र हल्ला करण्याची तयारी केली असल्याचे दक्षिण कोरियाने म्हटले आहे. दक्षिण कोरियन वृत्तसंस्था योनहापने दिलेल्या वृत्तात म्हटले आहे की, उत्तर कोरियाने पूर्वेकडील किना-यावर मध्यम पल्ल्याचे मूसूडान अण्वस्त्रधारी क्षेपणास्त्र तैनात केली आहेत.


त्यामुळे अमेरिकेने त्यापार्श्वभूमीवर अण्वस्त्र क्षेपणास्त्र सुरक्षा प्रणाली पाठवण्याची तयारी केली आहे. अमेरिकन संरक्षणमंत्री चेक हेगल यांनी म्हटले आहे की, उत्तर कोरियाकडून आता वास्तविक आणि स्पष्ट धोका आहे.

दक्षिण कोरियाने म्हटले आहे की, उत्तर कोरियाचा रॉकेट हल्ला करण्याचा इरादा आहे की नाही हे आताच सांगणे कठिण आहे. पण उत्तर कोरियाचे नेत्यांनी आपल्या लष्काराला अमेरिका जर 'स्टेट ऑफ वॉर'मध्ये आड आली तर, अमेरिकेवर सरळ हल्ला करावा. उत्तर कोरिया लष्कराने दिलेल्या निवदेनात म्हटले आहे की, अमेरिकन धोक्यांना आम्ही सहज निपटून काढू. उत्तर कोरियन लष्कराच्या या निवेदनावरुन स्पष्ट होते की, कोरियन द्वीपकल्पात आज ना उद्या युद्धाचे ढग बरसणार आहेत.

कोरियाई पीपुल्स आर्मीच्या एका अज्ञात जनरल ब्यूरोने अमेरिका आणि पेंटागनला धमकी देताना म्हटले आहे की, जर आमच्या विरोधातील शत्रुत्त्वाचे नाते व रणनिती जोपर्यंत तोडत नाही तोपर्यंत लहान व मध्यम पल्ल्याचे अणु हल्ले त्यांना सहन करावेच लागतील. हा धोका पाहून अमेरिकेने याआदीच बी-2 स्टील्थ बॉम्बर, एफ-22 स्टील्थ फाइटर जेट आणि बी-52 हेवी बॉम्बर तैनात केले आहेत.

उत्तर कोरियाच्या अण्वस्त्र हल्ल्याच्या धमकीनंतर अमेरि‍केचा जळफळाट