आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • US Vows To Defend Itself Against North Korea Nuclear Threat

उत्तर कोरियाच्या अण्वस्त्र हल्ल्याच्या धमकीनंतर अमेरि‍केचा जळफळाट

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

वॉशिंग्टन- उत्तर कोरियाने मागील आठवड्यात 'स्‍टेट ऑफ वॉर' घोषि‍त केल्यानंतर बुधवारी दक्षिण कोरि‍याच्या सुमारे सव्वाशे कामगारांना सीमेवर रोखण्यात आले. यानंतर पुन्हा एकदा अमेरि‍केने उत्तर कोरियावर डोळे लाल केले आहेत. पेंटागनने म्हटले आहे की, आमच्याकडे उत्तर कोरियाला ठीक करण्याची पर्यायी व्यवस्था आहे. पण आम्हाला आशा आहे की, भविष्यात असे काही आम्हाला करायला कोणी भाग पाडणार नाही.

पेंटागनचा माध्यम प्रवक्‍ता जॉर्ज लि‍टि‍लने बुधवारी म्हटले आहे की, आमच्याकडे दक्षिण कोरियाच्या साथीने उत्तर कोरियाला ठीक करण्याची व्यवस्था आहे. पण आम्हाला तसे वाटत नाही असे करायला कोणी भाग पाडेल. आम्ही जे नियोजन केले आहे, त्यानुसार आमचा संरक्षण विभाग आणि दक्षिण कोरिया मिळून संयुक्त कारवाई करेल. याआधी उत्तर कोरियाने अमेरि‍केला धमकी दिली होती त्यांच्या हवाईदलाला व नौदालाच्या सैन्‍य अड्डयांवर नि‍शाणा साधू. तसेच अण्वस्त्र हल्लाही करु, अशी थेट धमकीत अमेरिकेला दिली होती. उत्‍तर आणि दक्षिण कोरिया आता समोरा-समोर ठाकले आहेत. अमेरिकेनेही आपली संपूर्ण तयारी केली आहे. तर, इकडे शेजारील देश चीनने लष्कराला सतर्क केले आहे. त्यामुळे जग तिस-या महायुद्धाच्या उंबरठ्यावर असल्याचे तज्ञांचे म्हणणे आहे (वाचा बातमी, जग तिस-या महायुद्धाच्या उंबरठ्यावर? उ. कोरियाच्या नायनाटासाठी अमेरिका सज्ज, चीनही सतर्क)

अमेरिकीचे परराष्ट्र मंत्री जॉन केरी यांनी म्हटले आहे की, अमेरिकेला उत्तर कोरिया अण्वस्त्रधारी राष्ट्र बनलेले सहन होणार नाही. दुसरीकडे, युनोचे प्रमुख बान की मून यांनीही हा वाद सोडविण्यासाठी चर्चा करण्याचे आव्हान केले आहे. ते म्हणाले, अण्वस्त्र युद्ध काही खेळ नाही. यामुळे जगात अस्थिरता आणि भीती निर्माण होईल.

उत्तर कोरियाने शाब्दिक युद्धानंतर 2007 मध्ये बंद केलेले अण्वस्त्र प्रकल्प (रिएक्टर) परत सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे उत्तर कोरियाला आपल्या अण्वस्त्र शस्त्रास्त्राला व वीज उत्पादनाला आवश्यक असणारे प्लूटोनियम मिळणार आहे. मंगलवारी वृत्तसंस्था केसीएनएने याबाबत माहिती दिली आहे. मात्र हे स्पष्ट करण्यात आले नाही की, हा अणु रिअक्टर कधी सुरु होतील. चीनी परराष्ट्र मंत्रालयाने या बातमीनंतर निराशा व्यक्त केली आहे.