आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

वैश्य महासंमेलनाचा पहिला विदेशी चॅप्टर हाँगकाँगमध्ये सुरू

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

हाँगकाँग - आंतरराष्‍ट्रीय वैश्य महासंमेलनाचा परदेशातील पहिला चॅप्टर हाँगकाँगमध्ये सुरू करण्यात आला आहे. वैश्यांची संघटना पहिल्यांदाच भारताबाहेर पोहोचली असल्याची भावना महासंमेलनाचे सरचिटणीस बाबूराम गुप्ता यांनी व्यक्त केली.
हाँगकाँगच्या हॉटेल क्रालून संग्रीलामध्ये वैश्य समाजाच्या तीनशेहून अधिक सदस्यांच्या उपस्थितीत महासंमेलनाचे संस्थापक अध्यक्ष रामदास अग्रवाल यांनी याबाबत घोषणा केली. या वेळी उपस्थित लोकांनी हात उंचावून हाँगकाँग महासंमेलनाच्या चॅप्टरला मंजुरी दिली. अग्रवाल बैठकीत म्हणाले, आपण सर्वार्थाने सक्षम व कणखर आहोत, मात्र संघटित नाहीत. यामुळे आपल्या आवाज ऐकला जात नाही. एखाद्या मुद्द्यावर आपण एकमत तयार केल्यास लक्ष दिले जाईल, तसेच जगही दखल घेईल.
रामदास अग्रवाल तसेच वरिष्ठ कार्यकारी अध्यक्ष रमेशचंद्र अग्रवाल यांच्या नेतृत्वाखाली 15 सदस्यीय शिष्टमंडळ 24 ऑगस्ट रोजी हाँगकाँगला रवाना झाले होते. यामध्ये महासंमेलनाचे कार्यकारी अध्यक्ष, अखिल भारतीय अग्रवाल संमेलनाचे राष्‍ट्रीय अध्यक्ष व गोल्ड सुक ग्रुपचे चेअरमन सुरेंद्र गुप्ता, सरचिटणीस बाबूराम गुप्ता, परराष्‍ट्र विभागाचे सरचिटणीस रजनीश गोयंका, संयुक्त सरचिटणीस व मध्य प्रदेशमधील काँग्रेसचे सरचिटणीस गोविंद गोयल, संयुक्त सरचिटणीस व उद्योगपती ब्रजेश गुप्ता, समस्त भारतीय पार्टीचे अध्यक्ष व दुबईतील प्रसिद्ध व्यावसायिक सुदेश अग्रवाल व श्रीमती नीलकमल अग्रवाल, वरिष्ठ उपाध्यक्ष व उद्योगपती अशोक अग्रवाल आदी मान्यवर उपस्थित होते. हाँगकाँग चॅप्टरनंतर आंतरराष्‍ट्रीय वैश्य महासंमेलनाचा विस्तार जपान, थायलंड आणि सिंगापूरमध्ये लवकरच केला जाईल, असा विश्वास येथील अशोक मुंदडा, विनोद धारिवाल, मुकेश अड्रकिया, अजय जाकोटिया आदींनी व्यक्त केला. शिष्टमंडळ मंगळवारी मायदेशी परतले आहे.