युक्रेनची व्हेलेरिया ल्युकानोव्हा. वय 28 वर्षे. वजन : 42 किलो. कंबर : 19 इंच. शरीर तर हुबेहूब बार्बीसारखे. पण बार्बीसारखे दिसण्यासाठी तिने शरीरावर प्रचंड अत्याचार केले आहेत. या वेडेपणामुळे सोशल मीडियावरही ती टीकेस पात्र ठरली आहे. सोशल वेबसाइटवर तिने मेकअप न केलेले फोटो अपलोड केले. तेव्हापासून तिच्यावर जगभरातून टीकेची झोड उठली. आता तिला बार्बीच्या जगातून बाहेर पडायचे आहे. पण तिला एका वेगळ्याच दुनियेत जगायचे आहे. जाणून घेऊयात या जिवंत बार्बीच्या आयुष्यातील आश्चर्यकारक घटना..
अंधश्रद्धेच्या आहारी
व्हेलेरिया म्हणते, स्वत:मध्ये सकारात्मकता आणण्यासाठी मी बार्बी डॉल बनायचे ठरवे. मात्र ती युक्रेनमधील ‘स्कूल ऑफ आउट ऑफ बॉडी ट्रॅव्हल’ येथे विद्यार्थ्यांना शरीर सोडून आत्म्याला बाहेर काढण्यासाठी मार्गदश्रन करते. टीकाकारांच्या मते, ती पूर्णपणे अंधश्रद्धेच्या आहारी गेलेली आहे.
जेवणात फक्त पेज
व्हेलेरिया दिवसभरात फक्त 200 ते 300 कॅलरीज घेते. तेदेखील द्रवरूपात. नवजात बाळाचा एवढा आहार असतो. तिच्या वयाच्या तरुणी कमीत कमी 1200-1300 कॅलरीज घेतात. ब्रिटिश डाएटिक असोसिएशनच्या मते, व्हेलेरियाला आहारासंबंधीचा एखादा आजार असावा.
- व्हेलेरियाला भविष्यात फक्त हवा, पाण्यावर जगायचे आहे. तिच्या मते, दीर्घकाळ जगायचे असल्यास कमी खा. न खाताही जगता येऊ शकते.
- व्हेलेरियाने बार्बीसारखे बारीक व टोकदार नाक करण्यासाठी प्लास्टिक सर्जरी केल्याचेही बोलले जाते. मात्र तिच्या मते, तिने फक्त ब्रेस्ट इम्प्लांट केले आहेत.
(फोटो - व्हेलेरिया ल्युकानोव्हा)