हॅरिसबर्ग - मिस यूएसए 2014 पिजेंटमध्ये पेन्सिल्व्हेनियाचे प्रतिनिधीत्व करणारी 24 वर्षीय व्हेलेरी गाटोने स्वतः बद्दलचा एका खळबळजनक खुलासा करुन सर्वांनाच धक्का दिला आहे. तिच्या आईवर झालेल्या बलात्कारातून तिचा जन्म झाल्याचे व्हेलेरीने सांगितले आहे. व्हेलेरीची आई 19 वर्षांची असताना चाकूचा धाक दाखवून तिच्यावर अतिप्रसंग करण्यात आला होता, त्यातून तिचा जन्म झाला.
व्हेलेरीने आता निर्णय केला आहे, की या मंचावरून तिला लैंगिक शोषणाच्या बळी ठरलेल्या महिलांसाठी आणि महिला लैंगिक शोषणाच्या बळी ठरू नये यासाठी काम करता येईल. व्हेलेरी म्हणते, मला विश्वास आहे, की देवाने मला यासाठीच पाठवले आहे. तिला लोकांमध्ये विश्वास निर्माण करायचा आहे, की काहीही असंभव नाही. परिस्थितीनुसार जीवन जगण्यापेक्षा परिस्थितीवर मात करुन जगायला शिका.
व्हेलेरी सध्या एक वकील म्हणून लैंगिक शोषणाबद्दल जागृती करण्याचा प्रयत्न करीत आहे. ती देशात विविध ठिकाणी दौरा करुन 18 ते 30 वर्षांच्या महिलांसोबत चर्चा करते आणि त्यांना लैंगिक शोषणाची शिकार होण्यापासून कसे वाचता येईल याबद्दल माहिती देत असते. व्हेलेरीचे म्हणणे आहे, मिस यूएसएचा ताज जिंकल्यानंतर हे काम करण्यासाठी अधिक मोठे व्यासपीठ प्राप्त होईल.
पुढील स्लाइडमध्ये, जेव्हा व्हेलेरीला कळली तिच्या जन्माची चित्तरकथा...