आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Vasant Utsav Cancelled In Pakistan After Terrorist Threat

अतिरेक्यांपुढे शरणागती: पाकिस्तानात वसंतोत्सव रद्द

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लाहोर - वसंत व पतंग उत्सवाचे आयोजन करण्याच्या प्रयत्नात असलेल्या पंजाब सरकारने अतिरेक्यांच्या धमकीनंतर उत्सव रद्द केला. जमात-उद-दावाने दोन्ही उत्सव गैरइस्लामी ठरवत धमकी दिली होती.

पंजाबचे काळजीवाहू मुख्यमंत्री नजम सेठी यांनी अतिरेक्यांपुढे झुकत वसंत उत्सव रद्द करण्याचा निर्णय घेतला. वसंत उत्सव हा लाहोरी संस्कृतीचा भाग असल्याने तो नव्याने सुरू करण्याची इच्छा सेठी यांनी व्यक्त केली होती. यासंदर्भात सोमवारी उच्चस्तरीय बैठक घेण्यात आली. त्यात पोलिसांनी संभाव्य उत्सव सुरू केल्यास गंभीर परिणाम होऊ शकतील, असा इशारा दिला. दरम्यान, लाहोर संवर्धन सोसायटीचे सचिव आजम अनवर यांनी निर्णयाचा फेरविचार करण्याचे आवाहन केले आहे. मार्च 2009 मध्ये पंजाबमध्ये अखेरचा वसंत उत्सव साजरा झाला. पतंगाच्या दो-यामुळे अनेक जण जखमी होत असल्याच्या कारणावरून माजी मुख्यमंत्री शहाबाज शरीफ यांनी उत्सवावर बंदी आणली होती.

कराचीतील रेस्तरॉँमध्ये झरदारी यांचे मुलीसोबत डिनर
पाकिस्तानचे राष्‍ट्राध्यक्ष आसिफ अली झरदारी यांना कडक सुरक्षा असतानादेखील त्यांनी कराचीला जास्त भेटी दिल्या नाहीत. मात्र, त्यांनी सोमवारी मुलीसोबत येथील एका रेस्तराँमध्ये डिनर घेतल्याने अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला. झरदारी यांच्या कराचीतील बिलावल हाऊस निवासस्थानाजवळ हे रेस्तराँ आहे. राष्‍ट्राध्यक्ष व त्यांची मुलगी रेस्तराँमध्ये आले आहेत यावर माझा विश्वासच बसला नाही, असे चायना किचन रेस्तराँची मालकीण गजालाने सांगितले.