आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शाकाहारी दिनचर्येमध्ये दडलेय दीर्घायुष्याचे गुपित!

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

वॉशिंग्टन- शाकाहारी दिनचर्येमागे दीर्घायुष्याचे रहस्य आहे. त्याचबरोबर त्यातून निरोगी आयुष्यही मिळू शकते, असे संशोधकांनी मान्य केले आहे.
सामान्यपणे शाकाहारी दिनचर्येतून मानवाला अपेक्षित अनेक प्रकारचे लाभ होऊ शकतात, असा दावा एका संशोधनातून करण्यात आला आहे. काही हजार माणसांवर या संदर्भातील प्रयोग करण्यात आला. त्यात स्त्री-पुरुषांचा समावेश होता. डाएट आणि मृत्युदर यांच्यातील संबंध जाणून घेण्यासाठी हे संशोधन करण्यात आले. शाकाहारी दिनचर्येतून गंभीर आजार होण्याची शक्यता फारशी नसल्याचे अभ्यासातून दिसून आले. अर्थात हायपरटेन्शन, चयापचय क्रिया, मधुमेहासारखे आजारही तुलनेने व्यक्तीपासून दूर राहतात, असे अभ्यासातून दिसून आले आहे. लोमा लिंडा कॅलिफोर्निया विद्यापीठातील मायकल जे आॅर्लिच यांच्या टीमने या विषयात परीक्षण केले आहे .

स्वतंत्र प्रभाव : शाकाहाराचा फायदा सर्वांसाठी असला तरी त्यातही पुरुषांना तो महिलांच्या तुलनेत अधिक असल्याचे अभ्यासातून लक्षात आले आहे. शाकाहारी दिनचर्येतून मृत्युदराचे प्रमाण तुलनेने मांसाहारापेक्षा कमी राखता येऊ शकते.

कोणत्या रुग्णांचा अभ्यास
प्रकल्पात रुग्णांचे पाच भागात वर्गीकरण करण्यात आले होते. त्यात नॉनव्हेज, सेमी-व्हेज, पेस्को व्हेज (सी-फूड), लॅक्टो -व्हेज (डेअरी, अंडी), वेगान असे विभाग करण्यात आले होते.

कसा स्वभाव आढळला ?
व्हेज गटातील लोकांमध्ये विवाहित होण्याची तीव्र इच्छा दिसून आली. त्यांच्यात मोठे होणे, मद्यप्राशनाचे प्रमाण कमी, धूम्रपानही कमी आणि अधिक व्यायामाची सवय असल्याचे संशोधकांना पाहायला मिळाले.